शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

गोलंदाजांची भेदक कामगिरी;भारताचा 93 धावांनी विजय, मालिकेत विजयी आघाडी

By admin | Updated: July 1, 2017 07:05 IST

गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजचा 93 धावांनी पराभव केला आहे. खडतर परिस्थितीत महेंद्रसिंग धोनीने केलेल्या 78 धावा आणि डावाच्या

ऑनलाइन लोकमत

अॅंटिग्वा, दि. 1 - गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजचा 93 धावांनी पराभव केला आहे. खडतर परिस्थितीत महेंद्रसिंग धोनीने केलेल्या 78 धावा आणि डावाच्या अखेरीस केदार जाधवने (26 चेंडूत 40 धावा) केलेल्या फटकेबाजीच्या बळावर  भारताने वेस्ट इंडिजला 252 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने दिलेल्या 252 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 38.1 षटकांत केवळ 158 धावांमध्येच गारद झाला. भारताकडून फिरकी गोलंदाज आर.अश्विन आणि कुलदिप यादव यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. वेस्ट इंडिजकडून जेसन मोहम्मद याने सर्वाधिक 40 तर रोमॅन पॉवेल याने 30 धावांची खेळी करून थोडीफार लढत देण्याचा प्रयत्न केला पण इतर फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. या विजयासोबतच भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अशी विजयी आघाडी घेतली आहे. महेंद्रसिंग धोनीला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.  दोन्ही संघांमधील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.  

खराब सुरुवात झाल्यानंतर जबरदस्त सूर गवसलेला सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि युवराज सिंग यांनी नाबाद अर्धशतकी भागीदारी करताना वेस्ट इंडीजविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात भारताचा डाव सावरला.  अजिंक्य रहाणेने 72 धावांची चिवट खेळी केली. त्याला युवराज सिंगने 55 चेंडूत 4 चौकारांसह 39 धावा करून चांगली साथ दिली.  

रात्री पडलेल्या पावसामुळे तिसरा एकदिवसीय सामना ४५ मिनिटांनी उशिरा सुरू झाला. त्यानंतर नाणेफेक जिंकणाऱ्या वेस्ट इंडीजने भारताला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. पहिल्या दोन सामन्यांत अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन यांनी शतकी सलामी दिली होती; परंतु आज मात्र, भारतीय संघ चांगली सुरुवात करू शकला नाही.

सामन्याच्या तिसऱ्याच षटकात कमिन्सने शिखर धवनला (२) बाद केले. कमिन्सच्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर थर्डमॅनला हवेत मारलेला शिखर धवनचा फटका चेसने सहजरीत्या टिपला. विशेष म्हणजे जबरदस्त फार्मात असणारा धवन तब्बल ९ व्या डावानंतर एकेरी धावांत बाद झाला. धवन तंबूत परतला तेव्हा भारतीय संघाच्या धावफलकावर अवघ्या ११ धावा होत्या. त्यानंतर वेस्ट इंडीज गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना भारतीय फलंदाजांना जखडून ठेवले. त्यातच चांगला सूर गवसलेल्या विराट कोहलीला कर्णधार जेसन होल्डरने बाद करीत भारताला दुसरा धक्का दिला. होल्डरचा उजव्या यष्टीवर उसळत्या चेंडूवर कोहलीचा गलीमध्ये उडालेला झेल केल होप याने डावीकडून सूर मारून टिपला. सुरुवातीलाच दोन धक्के बसल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि युवराज सिंगने भारतीय संघाच्या डावाला आकार दिला. युवराज- रहाणे जोडी बाद झाल्यानंतर धोनीने सामन्याची सुत्रं आपल्या हाती घेतली. केदार जाधवसोबत शानदार भागीदारी रचत त्याने भारताला 250 धावांचा टप्पा ओलांडून दिला. 

या मालिकेत पहिला सामना ३९ षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसामुळे रद्द करावा लागला होता, तर पोर्ट आॅफ स्पेनचा दुसरा सामना भारताने १०५ धावांनी जिंकला होता.