शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

सामन्यावर गोलंदाजांचे वर्चस्व

By admin | Updated: April 23, 2017 03:07 IST

आयपीएलमध्ये ऐरवी होणारे सामने हे फलंदाजी विरुद्ध फलंदाजी असेच असतात. केवळ चौकार आणि षटकारांची बरसात, हे आयपीएलचे वैशिष्ट्य आहे. मात्र, मुंबई इंडियन्स

- आकाश नेवे

आयपीएलमध्ये ऐरवी होणारे सामने हे फलंदाजी विरुद्ध फलंदाजी असेच असतात. केवळ चौकार आणि षटकारांची बरसात, हे आयपीएलचे वैशिष्ट्य आहे. मात्र, मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली डेअर डेविल्स हा सामना याला अपवाद ठरला. दिल्लीच्या गोलंदाजांनी मुंबईला १४२ धावात रोखले आणि मुंबईच्या शिलेदारांनी दिल्लीला ही कमी असलेली धावसंख्यादेखील गाठू दिली नाही. दिल्लीचा कर्णधार जहीर खान याच्यासाठी मुंबईचे वानखेडे स्टेडिअम हे होम ग्राउंडच आहे, त्याने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि मुंबईच्या फलंदाजांची भंबेरी उडाली. मुंबईचा सलामीवीर जोश बटलर हा टी २० त आवश्यक असलेला स्ट्राईक रेट राखण्यात यशस्वी झाला. बटलरने १५५ च्या स्ट्राईक रेटने धुलाई केली. पोलार्ड, कृणाल आणि हार्र्दिक यांनी फक्त धावसंख्या वाढवली.

अमित मिश्रा आणि पॅट कमिन्स यांनी मुंबईच्या आक्रमक फलंदाजांना वेसण घातले. युवा स्फोटक नितीश राणा, कर्णधार रोहित शर्मा हे स्वस्तात बाद झाले. अमित मिश्रा याने तर एक षटक मेडन टाकण्याची कामगिरी केली. पॅट कमिन्सनेही चार षटकात २० धावाच दिल्या. यामुळे मुंबईला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. कमी धावांचे हे आव्हान दिल्लीचा संघ सहज पूर्ण करेल, असे वाटत असताना मुंबईच्या मॅकक्लेघनने तीन गडी बाद करताना, दिल्ली डेअर डेविल्सची आघाडी फळी फक्त २१ धावांत तंबूत पाठवली. ३९ चेंडूत २४ धावा आणि सहा बाद, अशी दिल्लीची धावसंख्या होती. दिल्लीच्या फलंदाजीचे आधारस्तंभ असलेले श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, रिषभ पंत, कोरे अँडरसन स्वस्तात बाद झाले. या सामन्यात करुण नायरने अत्यंत संथ फलंदाजी केली. त्याने १५ चेंडूंचा सामना करताना ५ धावा केल्या. तर युवा आदित्य तरे हा हार्दिक पांड्याच्या अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि थ्रोमुळे धावबाद झाला. या परिस्थितीतून दिल्लीला कागिसो रबाडा आणि ख्रिस मॉरिस यांनी बाहेर काढले. दोघांनी तुफान खेळी करत संघाला आघाडीवर नेले. दिल्ली जिंकेल, असे वाटत असतानाच मुंबईच्या गोलंदाजीने पुन्हा एकदा दिल्लीला बॅकफुटवर ढकलले. बुमराहने अप्रतिम चेंडूवर रबाडाला बाद केले आणि सामना मुंबईच्या बाजूने फिरला. कागिसो रबाडाचे हे आयपीएल १० मधील पदार्पण होते, त्याचे पर्दापण यशस्वी ठरले.

या सामन्यानंतर मुंबई गुणतक्त्यात आघाडीवर टिकून आहे. मुंबईने सात सामन्यात सहा विजय मिळवले आहेत. तर पर्पल कॅप सनरायजर्सच्या भुवनेश्वर कुमारकडे आहे. त्याने ७ सामन्यात १६ बळी घेतले आहेत. तर हैदराबादचाच कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने आज पुन्हा आॅरेंज कॅप पटकावली.