लाहली : युवा फलंदाज अंकित बावणोचे शनदार शतक आणि युसूफ पठाणच्या झटपट फलंदाजीच्या बळावर प. विभागाने दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व लढतीच्या दुस:या दिवशी गुरुवारी 9 बाद 321 अशी मजल गाठून पूर्व विभागावर आघाडी मिळविली आहे.
बावणोने 194 चेंडू टोलवीत 8 चौकार व 2 षटकारांसह 1क्5 आणि युसूफ पठाणने 73 धावा ठोकल्या. यामुळे खेळ संपेर्पयत पश्चिम विभागाकडे 43 धावांची आघाडी झाली. धवल कुलकर्णी 15 आणि शार्दुल ठाकूर 19 हे खेळत होते. पूर्व विभागाने पहिल्या डावात 278 धावा केल्या. बावणो आणि पठाण यांनी सहाव्या गडय़ासाठी 124 धावांची भागीदारी केली. प. विभाग संघ सुरुवातीच्या धक्क्यातून सावरत मोठय़ा आघाडीकडे वाटचाल करीत होता. पण पूव्रेचे गोलंदाज विशेषत: राणा दत्ता याने त्यांना रोखले. त्याने 6क् धावा देत 5 गडी बाद केले. पश्चिमने सकाळी बिनबाद 1क् वरून सुरुवात केली.
अशोक डिंडा याने आदित्य तारे (4) याला टिपले. कर्णधार चेतेश्वर पुजारा (1क्) आणि पार्थिव पटेल (1) हे देखील आल्यापावली परतले. विजय झोल (17) हा बाद होताच 4 बाद 47 अशी स्थिती झाली
होती. यानंतर बावणोला सूर्यकुमार यादव (31) याने काही वेळ साथ
देत पाचव्या गडय़ासाठी 74
धावा वसूल केल्या. बावणो 9
धावांवर असताना त्याला जीवदान मिळाले.
त्यानंतर त्याने कुणालाही संधी दिली नाही. 181 चेंडूंचा सामना करीत त्याने शतक गाठले. दुलिप करंडकात दुस:या सामन्यात हे त्याचे दुसरे शतक होते. गतवर्षी द. विभागाविरुद्ध नाबाद 115 धावांची खेळी त्याच्या नावावर आहे. प्रथम श्रेणीत नऊ शतकांची नोंद असलेला बावणो नंतर पायचित झाला. (वृत्तसंस्था)