शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बोपन्ना-दाब्रोवस्कीला फ्रेंच ओपनच्या मिश्र दुहेरीचे विजेतेपद

By admin | Updated: June 8, 2017 18:01 IST

भारताच्या रोहन बोपन्नाने फ्रेंच ओपनच्या मिश्र दुहेरीच्या विजेतेपदावर नाव कोरले आहे. रोहन बोपन्नाने कॅनडाची गाब्रिएला डाब्रोवस्की हिच्या

 ऑनलाइन लोकमत

पॅरिस, दि. 8 - भारताच्या रोहन बोपन्नाने फ्रेंच ओपनच्या मिश्र दुहेरीच्या विजेतेपदावर नाव कोरले आहे. रोहन बोपन्नाने कॅनडाची गाब्रिएला डाब्रोवस्की हिच्या साथीने आज झालेल्या अंतिम लढतीत आर. फराह आणि अली ग्रोनेफिल्ड यांच्यावर 2-6, 6-2, 12-10 अशी मात करत विजेतेपदावर कब्जा केला. बोपन्नाचे हे पहिलेच ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. तसेच ग्रॅँडस्लॅम विजेतेपद मिळवणारा तो लिएंडर पेस, महेश भूपती आणि सानिया मिर्झा यांच्यानंतरचा तो चौथा भारतीय ठरला आहे. 

अटीतटीच्या झालेल्या मिश्र दुहेरीच्या अंतिम लढतीत बोपन्ना आणि डाब्रोवस्कीला पहिल्या सेटमध्ये 2-6 असा पराभव पत्करावा लागला. मात्र पहिला सेट गमावल्यानंतर बोपन्ना आणि डाब्रोवस्की यांनी लढतीत जोरदार पुनरागमन केले. त्यांनी पुढच्या दोन सेटमध्ये जबरदस्त खेळ करत आर. फराह आणि अली ग्रोनेफिल्ड यांच्यावर हुकूमत राखली. बोपन्ना आणि डाब्रोवस्कीच्या इंडो कॅनेडियन जोडीने दुसऱ्या सेटमध्ये 6-2 असा विजय मिळवत लढतीत पुनरामन केले. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये आर. फराह आणि अली ग्रोनेफिल्ड यांनी कडवी टक्कर देत कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. पण बोपन्ना आणि डाब्रोवस्कीने त्यांची झुंज मोडून काढत हा सेट 12-10 असा जिंकला आणि विजेतेपदावर कब्जा केला. नदाल विजयी, जोको पराभूत

फ्रेंच ओपनचा गतविजेता नोवाक जोकोविच याला आॅस्ट्रेलियाचा सातवा मानांकित खेळाडू डॉमनिक थीम याने पराभवाचा धक्का दिला. थीम याने जोकोविचला ७-६(७-५), ६-३, ६-० असे पराभूत करत खळबळ माजवून दिली. थीमचा उपांत्य फेरीतील सामना आता ९ वेळच्या फ्रेंच ओपन विजेत्या राफेल नदाल याच्यासोबत होणार आहे.

 

जोकोविच आमि थीम यांच्यातील लढतीत पहिला सेट अटीतटीचा झाला. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये थीम याने जोकोवर वर्चस्व गाजवले. तिसऱ्या सेटमध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आणि गतविजेत्या जोकोविचला एकही गुण मिळवता आला नाही. हा सेट त्याने ६-० अशा मोठ्या फरकाने गमावला. या विजयासोबतच थीम याने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत त्याचा सामना नदाल सोबत होईल.