शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत विघ्नेशचे कांस्यपदक

By admin | Updated: September 30, 2016 20:18 IST

नुकत्याच पार पडलेल्या पोलंड येथील आंतरराष्ट्रीय सिरीझ अजिंक्यपद स्पर्धेत ठाणे शहरातील विघ्नेश देवळेकरने कांस्यपदकाला गवसणी घातली

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ३० : नुकत्याच पार पडलेल्या पोलंड येथील आंतरराष्ट्रीय सिरीझ अजिंक्यपद स्पर्धेत ठाणे शहरातील विघ्नेश देवळेकरने कांस्यपदकाला गवसणी घातली. स्पर्धेत पुरुष दुहेरीत दिल्लीच्या रोहन कपूरसह खेळताना विघ्नेशने डेन्मार्कच्या मानांकित क्रितोफर क्नुडसेन-टॅबिस सुडेर जोडीचा २-० असा धुव्वा उडवला.

ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेत विघ्नेशने बॅडमिंटनचे धडे गिरवले. एकेरीत उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर दुहेरीत रोहनच्या साथीने त्याने खेळास सुरुवात केली. पोलंड स्पर्धेत विघ्नेश-रोहन जोडीने शानदार खेळाचे प्रदर्शन करत पहिल्या सेटमध्ये २१-१२ असा विजय मिळवत सामन्यात १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये क्रितोफर-टॅबिस जोडीने योग्य समन्वय दाखवत काहीअंशी प्रतिकार केला. मात्र विघ्नेश-रोहन जोडीने आक्रमक स्मॅशच्या मदतीने त्यांचा प्रतिकार २१-१६ असा मोडीत काढत सामन्यात २-० अशा फरकाने विजय मिळवला व कांस्यपदकावर नाव कोरले.

नुकत्याच झालेल्या बेल्जिअम आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत देखील विघ्नेशने चांगला खेळ करत उपांत्यपूर्व सामन्यापर्यंत मजल मारली होती.आगामी झेकोस्लोव्हाकिया येथे होणाऱ्या राग आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विघ्नेश-रोहन जोडी आपले नशीब आजमावणार आहे. राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवल्यानंतर विघ्नेशने दुहेरी आणि मिश्र दुहेरी गटामध्ये विशेष लक्ष देत करिअर घडवण्याचा निर्णय घेतला. विघ्नेशचे वय अवघे २० वर्षे असल्याने त्याने विजयी कामगिरीत सातत्य राखल्यास तो खुप मोठा पल्ला गाठेल, असा विश्वास प्रशिक्षक श्रीकांत वाड यांनी व्यक्त केला.