शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशचा दक्षिण आफ्रिकेवर मोठा विजय

By admin | Updated: July 12, 2015 21:58 IST

मीरपूर : डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफीजूर रहमान आणि ऑफस्पिनर नासीर हुसेन यांच्या शानदार कामगिरीनंतर सौम्य सरकारच्या सुरेख फलंदाजीच्या बळावर बांग्लादेशने दुसर्‍या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर १३४ चेंडू आणि ७ गडी राखून सनसनाटी विजय मिळवला.

मीरपूर : डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफीजूर रहमान आणि ऑफस्पिनर नासीर हुसेन यांच्या शानदार कामगिरीनंतर सौम्य सरकारच्या सुरेख फलंदाजीच्या बळावर बांग्लादेशने दुसर्‍या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर १३४ चेंडू आणि ७ गडी राखून सनसनाटी विजय मिळवला.
पहिला सामना गमावल्यानंतर बांगलादेशने आजच्या सामन्यात जबरदस्त कामगिरी करताना तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार्‍या दक्षिण आफ्रिकेला ४६ षटकात १६२ धावांत गुंडाळल्यानंतर सरकार (७९ चेंडूंत नाबाद ८८) आणि महमुदुल्लाह (५0) यांनी तिसर्‍या गड्यासाठी केलेल्या १३५ धावांच्या भागीदारीच्या बळावर २७.४ षटकांत ३ बाद १६७ धावा करीत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील आपले स्थान निश्चित केले.
२००७ नंतर बांगलादेशचा हा दक्षिण आफ्रिकेवर पहिलाच विजय आहे. गेल्या १९ सामन्यात १४ सामने जिंकणार्‍या बांगलादेशाच्या विजयाचा पाया रचला तो गोलंदाजांनी. गेल्या महिन्यात भारतीय फलंदाजांवर दहशत निर्माण करणार्‍या मुस्तफीजूर आणि नासीर यांनी अनुक्रमे ३८ व २८ धावांत प्रत्येकी ३ गडी बाद करीत बांगलादेशच्या विजयात निर्णयाक योगदान दिले. रुबेल हुसेनने ३४ धावांत २ गडी बाद करीत त्यांना साथ दिली. दक्षिण आफ्रिकेकडून फाफ डु प्लेसिसने सर्वाधिक ४१ धावा केल्या तर फरहान बेहारडीनने ३६ धावा केल्या. याशिवाय कर्णधार आमलाने २२ धावा केल्या.
त्यानंतर कॅगिसो रबादा (२/४५) याने तमीम इकबाल (५) व लि˜न दास (१७) यांना लवकर बाद केले; परंतु सरकार व महमुदुल्लाह यांनी दक्षिण आफ्रिकेला डोके वर काढण्याची संधी मिळू दिली नाही. इम्रान ताहीरला षटकार ठोकत बांगलादेशचा विजय निश्चित करणार्‍या सरकारने १३ चौकार मारले.
त्याआधी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना प्रारंभापासूनच धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागला आणि नियमित अंतराने त्यांचे फलंदाज बाद होत गेले. विशेष म्हणजे ३२ व्या षटकात त्यांची धावसंख्या १00 वर पोहोचली होती आणि त्यानंतर लगेच जेपी ड्युमिनी (१३) याच्या रूपाने त्यांनी सहावा फलंदाज गमावला होता.
...........................................
संक्षिप्त धावफलक :
दक्षिण आफ्रिका : ४६ षटकांत सर्वबाद १६२. (फरहान बेहारडीन ३६, फाफ डू प्लेसिस ४१, आमला २२, मुस्तफीजूर रहमान ३/३८, नासिर हुसैन ३/२६, रुबेल हुसेन २/३४).
बांगलादेश : २७.४ षटकात ३ बाद १६७. (सौम्या सरकार नाबाद ८८, महमुदुल्लाह ५0. कॅगिसो रबादा २/४५).