शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

भुवनेश्वरचा पॉवर पंच, रोमहर्षक सामन्यात हैदराबादचा पंजाबवर विजय

By admin | Updated: April 18, 2017 01:51 IST

भुवनेश्वर कुमारच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर रोमहर्षक सामन्यात सनरायझर्स हैदराबादने किंग्स इलेव्हन पंजाबचा पराभव केला.

ऑनलाइन लोकमत
हेदराबाद, दि. 17 - किंग्स इलेव्हन पंजाब आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सोमवारी अतिशय रोमहर्षक झालेल्या सामन्यात हैदराबादने ५ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादने दिलेल्या १६० धावांचे आव्हान पेलताना पंजाबने १९.४ षटकांत सर्वबाद १५४ धावा केल्या. किंग्स इलेव्हन पंजाबचा सलामीवीर मनन व्होराची ९५ धावांची खेळी पंजाबला विजय मिळवून देऊ शकली नाही. भुवनेश्वर कुमारने घेतलेले पाच बळी हैदराबादच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. पर्पल कॅपधारी भुवनेश्वर कुमारला सामनावीरचा बहुमान देण्यात आला.

१६० धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या पंजाबची सुरुवात खराब झाली. डावाच्या पहिल्याच चेंडूवर सलामीवीर हाशिम आमला याला भुवनेश्वर कुमारने पायचित केले. आपल्या दुसऱ्या षटकांत भुवनेश्वरने पंजाबचा कर्णधार ग्लेन मॅक्सवेलला (१० धावा) वॉर्नरकरवी बाद करून पंजाबला मोठा धक्का दिला. यानंतर पुढचे तीन फलंदाज अफगाणअस्त्राने घायाळ झाले. इयान मोर्गनचा मोहम्मद नबीने १३ धावांवर त्रिफळा उडवला. त्यानंतर राशिद खानने एकाच षटकात डेव्हिड मिलर (१) आणि रिद्धीमान साहा (०) यांच्या दांड्या गुल करून पंजाबच्या शिडातील हवा काढून घेतली. पंजाबची अवस्था ५ बाद ६२ अशी झाली होती.एका बाजूला संघाची अशी वाताहत होत असताना सलामीवीर मनन व्होरा मात्र व्रतस्थ योद्ध्याप्रमाणे उभा होता. १५ व्या षटकानंतर मनन व्होराने आक्रमक धोरण स्वीकारले. शिखर धवनने मननला ८३ धावांवर जीवदान देऊन हैदराबादची धकधक आणखी वाढविली. विजयरेषेकडे सुरू असणारी मननची वाटचाल शेवटी भुवनेश्वरनेच थांबवली. एका स्लो फुलटॉसवर मननचे टायमिंग चुकले आणि तो पायचित झाला. त्याने ५० चेंडूत ९ चौकार आणि ५ षटकारांसह ९५ धावा केल्या. शेवटच्या षटकात ईशांतला बाद करुन सिद्धार्थ कौलने पंजाबचा डाव १५४ धावांत संपुष्टात आणला. तत्पूर्वी, पंजाबचा कर्णधार ग्लेन मॅक्सवेल याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शंभरी गाठायला हैदराबादला १५ व्या षटकाची वाट पाहावी लागली. केसी करियप्पाने ही जोडी फोेडली. ओझाला साहाने यष्टिचित केले. त्याने २० चेंंडूत ३४ धावा केल्या. मोहित शर्माच्या गोलंदाजीवर चौकार ठोकून वॉर्नरने किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध सलग पाचवे अर्धशतक केले. तो आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा सलामीला येऊन शेवटपर्यंत नाबाद राहिला. संक्षिप्त धावफलकसनराइजर्स हैदराबाद २० षटकांत ६ बाद १५९ धावा (डेव्हिड वॉर्नर नाबाद ७०, नमन ओझा ३४,शिखर धवन १५, अक्षर पटेल २/३३, मोहित शर्मा २/२५, संदीप शर्मा, करियप्पा प्रत्येकी १ बळी.)किंग्स इलेव्हन पंजाब १९.४ षटकांत सर्वबाद १५४ धावा(मनन वोहरा ९५, इयोन मोर्गन १३, ग्लेन मॅक्सवेल १०, मोहित शर्मा १०, भुवनेश्वर कुमार ५/१९,राशिद खान २/४२,कौल, मो. नबी, हेन्रिक्स प्रत्येकी १ बळी.)