शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

भुवनेश्वरमुळे आशा कायम

By admin | Updated: July 19, 2014 01:55 IST

लंडनमध्ये भारतीय संघाने पुन्हा एकदा वर्चस्व गाजवले, पण प्रतिस्पर्धी इंग्लंड संघानेही मानसिक कणखरतेचा परिचय देताना कसोटी ‘बॅलन्स’ राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

लंडन : लंडनमध्ये भारतीय संघाने पुन्हा एकदा वर्चस्व गाजवले, पण प्रतिस्पर्धी इंग्लंड संघानेही मानसिक कणखरतेचा परिचय देताना कसोटी ‘बॅलन्स’ राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. नाणेफेकीचा कौल मिळविल्यामुळे इंग्लंड संघ नशीबवान ठरला. त्यामुळे त्यांना ढगाळ वातावरणात पहिल्या दिवशी फलंदाजी करणे टाळता आले. भारताने प्रतिकूल परिस्थितीचा धैर्याने सामना करीत यजमान संघाला कोंडीत पकडले. खेळपट्टीचे स्वरुप बदलले असले, तरी भारतीय गोलंदाज भुवनेश्वरने अचूक मारा करीत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजविले.भुवनेश्वर कुमारने दुसऱ्या नव्या चेंडूने बॅलन्सची शतकी खेळी संपुष्टात आणताना भारताला पहिल्या डावात आघाडी मिळवून देण्याच्या आशा कायम राखल्या. इंग्लंडची एकवेळ ४ बाद ११३ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर बॅलन्स व मोईन अली (३२) यांनी पाचव्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. मोईन अलीला कामचलावू गोलंदाज मुरली विजयने माघारी परतवत ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर बॅलन्सही माघारी परतल्यामुळे इंग्लंडचा डाव अडचणीत आला. भारतातर्फे भुवनेश्वर कुमार सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४३ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. जडेजा व मुरली विजय यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. शमी, ईशांत व स्टुअर्ट बिन्नी यांची बळींची पाटी कोरीच राहिली.त्याआधी, गॅरीच्या (५१) अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने चहापानापर्यंत पहिल्या डावात ४ बाद १२५ धावांची मजल मारली होती. भारताच्या पहिल्या डावात २९५ धावसंख्येच्या प्रत्युत्तरात खेळताना इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली. इंग्लंडची सुरुवातीला २ बाद ३१ अशी अवस्था झाली होती. कुमारने त्यानंतर इयान बेलला (१६) तंबूचा मार्ग दाखविला. रविंद्र जडेजाने जो रुटचा (१३) अडथळा दूर करीत चहापानापूर्वी भारताला चौथे यश मिळवून दिले. भुवनेश्वर कुमारने दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी उपाहारापूर्वी इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी परतवले. उपाहाराला खेळ थांबला त्या वेळी इंग्लंडने २ बाद ५१ धावांची मजल मारली होती. भारताने पहिल्या डावात २९५ धावांची मजल मारली आहे.भुवनेश्वर कुमारने सुरुवातीला अ‍ॅलिस्टर कुक (१०) याला यष्टिरक्षक धोनीकडे झेल देण्यास भाग पाडले. इंग्लंडच्या कर्णधाराची निराशाजनक कामगिरी याही सामन्यात कायम राहिली. भुवनेश्वरने रचलेल्या सापळ्यात इंग्लंडचा कर्णधार अलगद सापडला. बाद होण्यापूर्वीच्या षटकात भुवनेश्वरने कुकविरुद्ध वर्चस्व गाजविले. त्यानंतर डावाच्या ११ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर कुकला झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर चार षटकांनी दुसरा सलामीवीर सॅम रोबसन (१७) भुवनेश्वरचे लक्ष्य ठरला. त्यापूर्वी कालच्या ९ बाद २९० धावसंख्येवरून पुढे खेळताना भारताचा डाव आज २९५ धावांत संपुष्टात आला. बेन स्टोक्सने (२-४०) शमीला कुककडे झेल देण्यास भाग पाडले. कुकचा कसोटी कारकीर्दीतील हा १०० वा झेल ठरला. (वृत्तसंस्था)