अ. भा. कबड्डी जोड
By admin | Updated: February 10, 2015 00:56 IST
या स्पर्धेचे पर्यवेक्षक म्हणून ॲमेच्युअर कबड्डी फेडरेशनचे उपाध्यक्ष किशोर पाटील येणार आहेत. त्यांच्यासमवेत जीतू ठाकूर आणि सुनील चिंतलवार जबाबदारी सांभाळतील.
अ. भा. कबड्डी जोड
या स्पर्धेचे पर्यवेक्षक म्हणून ॲमेच्युअर कबड्डी फेडरेशनचे उपाध्यक्ष किशोर पाटील येणार आहेत. त्यांच्यासमवेत जीतू ठाकूर आणि सुनील चिंतलवार जबाबदारी सांभाळतील. स्थानिक उत्कृष्ट संघांनादेखील दोन्ही गटात आमंत्रित करण्यात आल्याचे व्यास यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.पत्रपरिषदेला क्रीडा समितीचे चेअरमन हरीश डिकोंडवार, शिक्षण समिती सभापती चेतना टांक, संयोजक सुधीर राऊत, शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे, जिल्हा कबड्डी संघटनेचे सचिव सुनील चिंतलवार, डॉ. हंबीरराव मोहिते, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांची उपस्थिती होती.(क्रीडा प्रतिनिधी)................................................................सहभागी संघपुरुष :- लकी वंडर्स इंदूर, आर्मी जाट सेंटर बरेली, दपूम रेल्वे कोलकाता, के. के. पंडाल्या जयपूर, आरडब्ल्यूडी बेंगळुरु, ओहनजीसी दिल्ली, एसस्सी कोच चेन्नई, उत्तर प्रदेश पोलिस, आयटीबीटी दिल्ली, सीमा सुरक्षा बल, कृष्णा क्रीडा मंडळ सिकंदराबाद, वंदे मातरम् जयपूर, बीएसएफसी, हरियाणा, सोनिपत, मध्य रेल्वे मुंबई, पश्चिम रेल्वे मुंबई, अशोका कोलकाता आणि बाबा हरदास मंडळ दिल्ली........................................................महिला संघ :- पंजाब, एनसीपीई उत्तर प्रदेश, हरियाणा, शिव ओम क्रीडा प्रतिष्ठान पुणे, सोनिपत, शिवाजी क्रीडा मंडळ उज्जैन, शिवशक्ती मुंबई, शिरोडकर क्लब मुंबई, राजमाता जिजाऊ क्लब पुणे, एम. एस. क्रीडा मंडळ पुणे, सुवर्ण युग क्लब पुणे, चंदन नगर क्लब कोलकाता, पालम स्पोर्टस् क्लब दिल्ली, आणि अशोका क्लब दिल्ली.........................................................