शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वोत्तम सामना : विराट

By admin | Updated: June 12, 2017 01:06 IST

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने दक्षिण आफ्रिकेवरील आठ विकेटने मिळवलेल्या विजयानंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील आपला

लंडन : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने दक्षिण आफ्रिकेवरील आठ विकेटने मिळवलेल्या विजयानंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील आपला आतापर्यंतचा सर्वोत्तम सामना असल्याचे म्हटले आहे. बर्मिंगहॅम येथे बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या सामन्यातही अशा सामन्याची पुनरावृत्ती होईल अशी आशाही विराटने व्यक्त केली.कोहली म्हणाला, ‘‘नाणेफेक जिंकणे चांगले राहिले. खेळपट्टी विशेष काही बदललेली नव्हती. फलंदाजीसाठी ती पोषक होती. आज आमचे क्षेत्ररक्षण चांगले राहिले आणि त्यांना गोलंदाजांनीही पूर्ण साथ दिली. जेव्हा संधी मिळते तेव्हा तुम्हाला फायदा घ्यायला हवा. डिव्हिलियर्सला लवकर बाद करण्यात यशस्वी ठरलो हे आमच्यासाठी चांगले होते. कारण तो तुम्हाला नुकसान पोहोचवू शकतो.’’विराटने धवनचीदेखील प्रशंसा केली. कोहली म्हणाला, ‘‘कोणी तरी शेवटपर्यंत फलंदाजी करणे आवश्यक होते. शिखरने बेजोड फलंदाजी केली. आम्ही आतापर्यंत जितके सामने खेळले त्यातील हा शक्यतो सर्वोत्तम होता.’’भारताचा उपांत्य फेरीचा सामना बर्मिंगहॅम येथे बांगलादेशविरुद्ध होणार आहे आणि कोहलीने तेथील खेळपट्टी आवडत असल्याचे सांगितले; परंतु त्याचबरोबर अति आत्मविश्वास न बाळगण्याचा सल्लाही आपल्या खेळाडूंना त्याने दिला. तो म्हणाला, ‘‘आम्ही बर्मिंगहॅम येथे खेळलो आहोत आणि आम्हाला तेथील खेळपट्टी आवडते. ती आमच्या खेळाच्या अनुकूल आहे. आम्ही मागे वळून पाहत नाही. सुधारण्यासाठी नेहमीच वाव राहतो.’’२८ धावांत २ बळी घेणारा जसप्रीत बुमराह सामनावीर ठरला. तो म्हणाला, ‘‘आमच्यासाठी हा महत्त्वपूर्ण सामना होता. आम्ही शांतचित्त राहून आपल्या व्यूहरचनेची अंमलबजावणी करू इच्छित होतो. मला जी जबाबदारी दिली जाते त्यात मी आनंदित आहे. चेंडू जास्त स्विंग होत नव्हता, त्यामुळे आम्ही बेसिक्सवर कायम राहिलो आणि आम्ही योग्य दिशेने गोलंदाजी करताना त्यांना आक्रमक खेळू दिले नाही. ’’