शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

आयपीएल-१0मधील सर्वोत्तम खेळी

By admin | Updated: May 6, 2017 03:13 IST

गुरुवारी रात्री ९७ धावांची निर्णायक वादळी खेळी करणाऱ्या ऋषभ पंतची ९७ धावांची खेळी ही इंडियन प्रीमिअर लीगमधील आतापर्यंतच्या

नवी दिल्ली : गुरुवारी रात्री ९७ धावांची निर्णायक वादळी खेळी करणाऱ्या ऋषभ पंतची ९७ धावांची खेळी ही इंडियन प्रीमिअर लीगमधील आतापर्यंतच्या सर्वोत्तम खेळ्यांपैकी एक असल्याचे मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले.ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांच्या स्फोटक अर्धशतकी खेळीच्या बळावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने लायन्सची २0८ ही धावसंख्यादेखील खुजी ठरवली. त्यानंतर तेंडुलकरने टिष्ट्वट केले, ‘मी आयपीएलच्या गत दहा पर्वातील जितक्या खेळ्या पाहिल्य त्यातील ही सर्वोत्तम खेळीपैकी एक आहे.’ पंत आणि सॅमसन यांनी दुसऱ्या गड्यासाठी अवघ्या ६३ चेंडूंत १४३ धावांची भागीदारी केली. ऋषभच्या या खेळीची प्रशंसा माजी आणि विद्यमान क्रिकेटपटूंनीदेखील केली आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्य हरभजनने टिष्ट्वट केले, ‘ऋषभने शानदार खेळी केली. कौशल्यपूर्ण युवा खेळाडू.’ सनराजयर्स हैदराबादचे प्रशिक्षक टॉम मुडी म्हणाली, ‘यापेक्षा जास्त सुरेख खेळीची अपेक्षा करू शकत नाही.’ माजी स्टार फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने लिहिले, ‘दोन युवाप्रतिभाशाली फलंदाज संजू सॅमसन आणि ऋषभ पंत यांची सुरेख खेळी. त्यांची सकारात्मकता, कौशल्य आणि बेधडकपणा मला आवडला.’ माजी कर्णधार सौरभ गांगुलीने लिहिले, ‘ऋषभ पंत, संजू सॅम्सन यांची अप्रतिम खेळी. सर्व संघांनी यांच्याकडेलक्ष ठेवावे. हे विशेष आहेत.’ मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने लिहिले, ‘ऋषभ पंत हा शतकासाठी पात्र होता. सुरेख खेळी.’ बेधडक खेळणाऱ्या वीरेंद्र सेहवागच्या हृदयालाही ऋषभ पंत याची खेळी भिडली. सेहवागने लिहिले, ‘ज्या फलंदाजांना स्वत:वर विश्वास असतो आणि ज्यांच्याजवळ चेंडूला हिट करण्याचे विशेष कौशल्य असते ते मला खूप आवडतात. ऋषभ पंतची ही विशेष खेळी.’ (वृत्तसंस्था)शतकाची नव्हे विजयाची चिंता होती : पंत दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या गुजरातवरील विजयात ९७ धावांचे योगदान देणाऱ्या ऋषभ पंतचे शतक केवळ तीन धावांनी हुकले. पण आपण शतकाचा नव्हे तर लक्ष्य गाठण्याचा विचार केल्याचे ऋषभचे मत आहे. पंतशतकापासून तीन धावा दूर असताना  फटका मारण्याच्या नादात तो बादला. त्यानंतर तो म्हणाला, ‘मी शतकाबद्दल नव्हे तर विजयी लक्ष्य गाठण्याबद्दल विचार करीत होतो. तीन धावा निघाल्या असत्या तर सामनादेखील मीच संपविला असता. माझे फलंदाजीचेतंत्र सोपे आहे. मी चेंडू पडताळतो. त्यावर हिट मारणे जमत असेल तर चौकार किंवा षटकार खेचण्याचा प्रयत्न असतो. आम्हीएकापाठोपाठ एक विजय कसे मिळवायचे याचा विचार करीत आहोत. प्ले आॅफचा विचार अद्यापही मनाला शिवलेला नाही.विजय मिळवित प्ले आॅफपर्यंत पोहोचणे हे आमचे लक्ष्य आहे.पंत, सॅमसन प्रशंसेस पात्रनवी दिल्ली : ऋषभ पंत आणि संजू सॅमसन या युवा गोलंदाजांच्या धडाकेबाज फलंदाजीवर आनंदी झालेले दिल्ली डेअरडेव्हिल्सचे कोच राहुल द्रविड यांनी हे दोन्ही फलंदाज प्रशंसेस पात्र असल्याचे म्हटले आहे. गुजरातविरुद्ध २०८ धावांचे लक्ष्य गाठल्यानंतर द्रविड यांनी दोघांच्या उत्कृष्ट फलंदाजीचे कौतुक केले. ‘पंतच्या नि:स्वार्थ खेळीचे कौतुक करीत संघाच्या हितासाठी असाच हेतूबाळगण्याची गरज असल्याचे सांगितले. ऋषभ आपल्या शतकाबद्दल चिंताग्रस्त जाणवला नाही. त्याचा कल नेहमी संघाचा विजय साकार करण्याकडे असतो. मी कडक शिक्षक आहे. पुढच्या सामन्यात दोघेही विजयावर शिक्कामोर्तब करीत मैदानाबाहेर याल, अशी अपेक्षा आहे.’