शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

#BestOf2017 : क्यू खेळांमध्ये यावर्षी पंकज अडवाणीचा बोलबाला

By namdeo.kumbhar | Updated: December 27, 2017 18:32 IST

भारताचा स्टार क्यू खेळाडू पंकज अडवाणी याने आपले कमालीचे सातत्य कायम राखताना 2017 मध्ये आपल्या खेळाचा जलवा कायम राखल्याचे पहायला मिळाले.

मुंबई : भारताचा स्टार क्यू खेळाडू पंकज अडवाणी याने आपले कमालीचे सातत्य कायम राखताना 2017 मध्ये आपल्या खेळाचा जलवा कायम राखल्याचे पहायला मिळाले. पंकजनं तब्बल १८व्यांदा आयबीएसएफ जागतिक स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद उंचावले. गेल्या दहा वर्षामध्ये पंकजनं स्नूकर आणि बिलियर्ड्स या खेळामध्ये भारताचे नाव उंचावले आहे. त्यानं यावर्षी एक नवा अध्याय लिहला असे म्हणायला हरकत नाही. साधारणत: खेळाडू स्नूकर आणि बिलियर्ड्स यापैकी एकाचीच निवड करतात. पण पंकजनं दोन्हीत प्रावीण्य मिळवत अनेक विजेतेपदं पटकावत भारताचं नाव रोषण केलं आहे. 

भारतासाठी आणि क्यू खेळासाठी 2016 प्रमाणेच 2017चे वर्ष राहिले आहे. गेल्या काही वर्षापासून पंकज अडवाणीनं क्यू खेळामध्ये भारताचा दबदबा निर्माण केला आहे. पंकजचा हा दबदबा यावर्षीही पहायला मिळाला, त्यानं आपल्या विश्वविजेतेपदामध्ये यावर्षी आणखी एक मानाचा तुरा रोवला. यावर्षी पंकजने 18 वे शानदार विश्व जेतेपद पटकावताना इराणच्या आमिर सरखोश याचे आव्हान परतावले.2012 पर्यंत पंकज फक्त स्नूकर खेळत असे. बिलियर्ड्सही खेळू शकतो असा विश्वास त्याला वाटला. पंकजचा भाऊ आणि क्रीडा मानसशास्त्रज्ञ श्री तसेच प्रशिक्षक यांच्याशी चर्चा केली आणि दोन्ही खेळ खेळण्याचा निर्णय त्यानं घेतला. दोन्ही खेळ खेळणारे असंख्य खेळाडू आहेत, मात्र दोन्ही खेळांमधील वेळ आणि गुण प्रकारांत एकाच वेळी विश्वविजेतेपद पटकावणारा पंकज एकटाच आहे. दोन्ही खेळांच्या स्पर्धा खेळत असल्याने मेंदू थकण्याऐवजी ताजातवाना होतो. स्पर्धा, सराव यांचे वेळापत्रक जपताना कसरत होते. सतत प्रवास होतो. मात्र काही तरी आव्हानात्मक गोष्ट साध्य केल्याची भावना सुखावणारी असते. असे पंकज सांगतो. 

32 वर्षीय पंकजने 2017 मध्ये अपेक्षानुसार खेळ दाखवला. त्यानं स्नूकर आणि बिलियर्ड्स या दोन्ही मध्ये यश संपादन केलं. पंकजच्या नावे सध्या 18 विश्वविजेतेपद आहेत. जुलै 2017 मध्ये त्यानं करगीस्थानमध्ये त्यानं सुवर्णपदक पटकावले होतं. त्यानं पाकिस्तानी संघाचा 2-0नं दारुण पराभव केला होता. 

पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर कसे वाटले असा प्रश्न विचारल्यानंतर पंकजनं अतिशय नम्रमपणे उत्तर दिले. तो म्हणाला, माझ्यासाठी सर्व खेळाडू सारखेच आहेत. मग तो पाकिस्तानचा असो किंवा अन्य देशाचा मला काही फरक पडत नाही. माझ फक्त विजयावर लक्ष असते. पाकिस्तान विरोधात सामना असल्यास प्रत्येक खेळाडूवर दबदबा आणि अपेक्षा असतात. मग तो खेळ कोणताही असो. हे आपण नाकारु शकत नाही. अशी परिस्थिती असताना विजय मिळवणे म्हणजे कौतुकास्पदच आहे. स्नूकर आणि बिलियर्ड्समध्ये मध्ये राष्ट्रीय खिताब जिंकलेला पंकज आडवाणी पहिला भारतीय पुरुष खेळाडू आहे. 

यावर्षी 40 वर्षीय विद्या पिल्लैनं सिंगापूरमध्ये विश्व महिला स्नूर चॅम्पियनशिपमध्ये  रजत पदक जिंकले आहे. हाँगहाँच्या एंग ओन यीनं तिचा पराभव केला होता. मध्यप्रदेशच्या कमल चावला ने विश्व 6 रेड्स स्नूकर चॅम्पियनिशपच्या अंतिम लढतीत धडक मारली होती. पण डेरेन मोर्गननं पराभव करत जेतेपद पटकावलं. नोव्हेंबरमध्ये दोहामध्ये झालेल्या अंतिम सामन्यात पंकजने ८-२ अशी एकतर्फी बाजी मारत आपल्या खात्यात आणखी एका विश्व विजेतेपदाची भर टाकली. बेस्ट ऑफ १५ यानुसार खेळविण्यात आलेल्या या लढतीत सरखोशने पहिला फ्रेम जिंकत अनपेक्षित सुरुवात केली होती. मात्र, यानंतर पंकजने सलग चार फ्रेम जिंकताना ४-१ अशी आघाडी मिळवत आपला हिसका दिला. सहाव्या फ्रेममध्ये पुन्हा एकदा सरखोशने १३४ गुणांसह बाजी मारत आपली पिछाडी २-४ अशी कमी केली. मात्र, यानंतर जराही एकाग्रता न गमावलेल्या पंकजने जबरदस्त नियंत्रण सादर करताना पुन्हा एकदा सलग चार फ्रेम जिंकत सुवर्ण पदक आपल्या नावावर केले.

टॅग्स :Best of 2017बेस्ट ऑफ 2017