शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

बंगाल वॉरीयर्सचा थरारक विजय

By admin | Updated: July 23, 2015 00:54 IST

संपुर्ण सामन्यात दबावाखाली राहिलेल्या यजमान बंगाल वॉरियर्सने अखेरच्या काही मिनिटांमध्ये बाजी पलटवताना गतविजेत्या जयपूर पिंक पँथर्स संघावर

कोलकाता : संपुर्ण सामन्यात दबावाखाली राहिलेल्या यजमान बंगाल वॉरियर्सने अखेरच्या काही मिनिटांमध्ये बाजी पलटवताना गतविजेत्या जयपूर पिंक पँथर्स संघावर २८-२६ असा थरारक विजय मिळवला. निलेश शिंदे, सचिन कांबळे आणि बाजीराव होडगे यांच्या भक्कम बचावाच्या जोरावर बंगालने बाजी मारली. बंगालने पहिला विजय मिळवला असून जयपूरला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. अन्य सामन्यात बंगळुरु बुल्सने एकतर्फी झालेल्या सामन्यात पटना पायरेट्सचा ३१-२६ असा धुव्वा उडवला.नेताजी बंदिस्त स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात अखेरच्या मिनीटाला बंगाल २६-२५ असे पिछाडीवर होते आणि पिंक पँथर्सचा केवळ समरजीत सिंग मैदानात असल्याने विजयासाठी बंगालला समरजीतची पकड करुन लोन चढवणे आवश्यक होते. या दबावाच्या क्षणी समरजीतने देखील वेळ घालवण्याचा प्रयत्न केला मात्र बंगालने समरजीतला दबावाखाली आणण्यात यश मिळवत निर्णायक पकड केली आणि जयपूर संघावर लोण चढवून थरारक विजय मिळवला.मध्यंतराला जयपूरने १४-९ अशी आघाडी घेत सामन्यावर मजबूत पकड मिळवली होती. मात्र यानंतर बंगालने जबरदस्त पुनरागमन करताना जयपूरला दबावाखाली आणले. निलेशने तब्बल ३वेळा सुपर टॅकेल करताना जयपूरच्या चढाईपटूंना जेरीस आणले. सचिन आणि बाजीरावने देखील त्याला बचावात चांगली साथ दिली. कर्णधार दिनेश कुमार व जँग कुन ली यांनी चढाईमध्ये प्रत्येकी ३ गुण मिळवले. पराभूत जयपूरकडून जसवीर सिंगने एकाकी झुंज देत सर्वाधिक १० गुण मिळवले. यानंतर झालेल्या सामन्यात बंगळुरु बुल्स संघाने दुसरा विजय मिळवताना पटणा पायरेट्सला सहज लोळवले. सुरुवातीपासूना आक्रमक खेळ केलेल्या बुल्सने जबरदस्त वर्चस्व राखताना पायरेट्सवर तब्बल ४ लोण चढवले. मध्यंतराला १६-८ असे वर्चस्व राखलेल्या बुल्सला दुसऱ्या सत्रात पायरेट्सने चांगली झुंज दिली. मात्र पिछाडी मोठी असल्याने पायरेट्स संघ अखेरपर्यंत दबावाखाली राहिला. दरम्यान पायरेट्सने यावेळी २ वेळा लोनची परतफेड करताना पुनरागमनासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र बुल्सने मिळवलेली पकड अखेरपर्यंत सोडली नाही. मनजीत चिल्लर सामन्यात दबदबा राखताना बंगळुरु बुल्सकडून शानदार अष्टपैलू खेळ केला.त्याला राजेश मोंडल आणि प्रदीप नरवाल यांनी आक्रमणात तर जोगिंदर नरवालने बचावामध्ये चांगली साथ दिली. दुसऱ्या बाजूला कर्णधार राकेश कुमार आणि संदीप नरवाल यांचा झुंजार अष्टपैलू खेळ पटना पायरेट्सचा पराभव टाळू शकला नाही.(वृत्तसंस्था)