शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
3
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
4
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
5
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
6
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
9
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
10
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
11
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
12
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
13
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
14
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
15
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
16
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
17
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
18
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
19
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
20
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार

बेल्जियमची विजयी सलामी

By admin | Updated: June 18, 2014 06:35 IST

मध्यांतरानंतर एका गोलने माघारल्यानंतरही उत्तरार्धातील दहा मिनिटांच्या खेळात दोन गोल नोंदविणाऱ्या बेल्जियम संघाने मंगळवारी फिफा विश्वचषकात अल्जीरियाचा २-१ ने पराभव करीत विजयी सलामी दिली

बेलोहोरिजोंटे : मध्यांतरानंतर एका गोलने माघारल्यानंतरही उत्तरार्धातील दहा मिनिटांच्या खेळात दोन गोल नोंदविणाऱ्या बेल्जियम संघाने मंगळवारी फिफा विश्वचषकात अल्जीरियाचा २-१ ने पराभव करीत विजयी सलामी दिली. विजयी संघाकडून दोन्ही गोल बदली खेळाडू फेलाईनीने ७० व्या मिनिटाला आणि मर्टेन्सन ८० व्या मिनिटाला केले. पराभूत अल्जीरियाकडून सोफियाने फगोऊली याने २५ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर गोल नोंदवून आघाडी मिळवून दिली होती. या सामन्यात अर्ध्याहून अधिक वेळ बेल्जियमचेच वर्चस्व होते. ५६ हजार ८०० पेक्षकांच्या उपस्थितीत बेल्जियमच्या खेळाडूंनी मध्यांतरानंतर अल्जीरियाच्या कमकुवत झालेल्या बचावफळीवर वारंवार हल्ले चढविले. त्यातून त्यांना दोनवेळा गोल देखील नोंदविता आले. सामन्यात बरोबरी साधणारा गोल ७० व्या मिनिटाला मिडफिल्डर मारोने फेलाईनी याने डी ब्रूएनच्या पासवर नोंदविताच स्टेडियममध्ये उपस्थित बेल्जियमच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला तर अल्जीरियाचे चाहते सुन्न झाले होते. यानंतर दहा मिनिटांनी हॅझर्डस्च्या पासवर ड्रिईस मर्टेन्सने दुसरा गोल नोंदविताच चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आले.बेल्जियमच्या सर्वच खेळाडूंनी मर्टेन्सला गराडा घालून त्याचे कौतुक केले. अखेरच्या दहा मिनिटात बेल्जियमने चालढकल करण्याचे तंत्र अवलंबले होते. त्यात त्यांना यश आले. २-१ अशी आघाडी अखेरपर्यंत जटकल्यामुळे सामन्यात बेल्जियमची सरशी झाली.त्याआधी, फॉरवर्ड सोफियाने फागोऊलीने नोंदविलेल्या गोलच्या जोरावर अल्जीरियाने मध्यंतरापर्यंत १-० अशी आघाडी मिळविली होती. फागोऊलीने २५ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीचा लाभ घेत संघाचे खाते उघडले. कारकीर्दीतील २० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या फगोउलीचा हा सहावा आंतरराष्ट्रीय गोल ठरला.सामन्याच्या पहिल्या सत्रात बेल्जियमच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवले, पण त्यांना गोल नोंदविण्यात यश मिळाले नाही. ‘एच’ गटात बेल्जियम सर्वांत बलाढ्य संघ मानल्या जात आहे. या गटात बेल्जियम व अल्जीरिया यांच्या व्यतिरिक्त रशिया व दक्षिण कोरिया या संघांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)