शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

विम्बल्डन चॅम्पियन होणे ही विलक्षण अनुभूती

By admin | Updated: July 13, 2015 00:42 IST

टेनिसमधील सर्वांत प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या विम्बल्डन महिला दुहेरीचे जेतेपद मिळविण्याची ऐतिहासिक कामगिरी करणे, ही माझ्या दृष्टीने विलक्षण अनुभूती असल्याची

नवी दिल्ली : टेनिसमधील सर्वांत प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या विम्बल्डन महिला दुहेरीचे जेतेपद मिळविण्याची ऐतिहासिक कामगिरी करणे, ही माझ्या दृष्टीने विलक्षण अनुभूती असल्याची प्रतिक्रिया स्टार चॅम्पियन सानिया मिर्झा हिने व्यक्त केली.जेतेपद मिळविल्यानंतर सानियाने लंडन येथे दिलेल्या मुलाखतीत सांगितले, ‘कालचा अंतिम सामना आतापर्यंतचा सर्वश्रेष्ठ सामना होता. कारण येथे चारही खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली. सर्वांनी शानदार टेनिसचा नमुना सादर केला. आम्ही जेतेपद सर केले, याचा आनंद वाटतो. विम्बल्डन चॅम्पियन होणे, हीच माझ्यादृष्टीने विलक्षण अनुभूती आहे.पुन्हा एकदा ‘नंबर वन’विम्बल्डन महिला दुहेरीतील विजेती जोडी सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस यांना सोमवार पासून सुरु होणाऱ्या जागतिक मानांकन स्पर्धेच्या ‘रोड टू सिंगापूर - डबल रेस’ स्पर्धेत पुन्हा एकदा अव्वल स्थानी पोहचेल. सिंगापूरमध्ये होणाऱ्या डब्ल्यूटीए फायनल्समध्ये विम्बल्डन सुरु होण्याआधी सानिया - हिंगीस जोडी द्वितीय क्रमांकावर होती.अमेरीकेची बेथानी माटेक आणि झेक प्रजासत्ताकची लूसी सफारोवा या जोडीने पहिले स्थान पटकावले होते. परंतु, आता विम्बल्डन विजेतेपद पटकावल्यानंतर मार्टिना - हिंगीस जोडी सिंगापूर रेसमध्ये पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर विराजमान होईल. वर्षाच्या शेवटी होणाऱ्या डब्ल्यूटीए फायनल्समध्ये जगातील अव्वल आठ जोडी सहभागी होतात. क्रिकेट लीजेंड मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे विम्बल्डन प्रेम जगजाहीर आहे. पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यासाठी देखील त्याने हजेरी लावली होती. पहिल्यांदा विम्बल्डन विजेतेपद पटकावलेल्या सानियाचे अभिनंदन करताना सचिनने ट्वीट केले की, ‘या शानदार विजेतेपदासाठी सानिया - हिंगीस यांचे सर्वप्रथम खुप अभिनंदन. भविष्यात देखील तुम्ही अशीच विजेतेपद जिंकाल अशी आशा करतो.पंतप्रधान म्हणाले, ‘‘मार्टिना आणि सानिया, आपण छान खेळ केला. शानदार खेळ करीत विम्बल्डन जिंकल्याबद्दल आम्ही गौरवान्वित झाल्याचा आनंद आहे.’’