शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वर्तन सुधार! सामनाधिका-यांनी धोनीला दिली समज

By admin | Updated: April 7, 2017 15:39 IST

आयपीएलमध्ये प्रथमच कर्णधारपदाशिवाय खेळणा-या महेंद्रसिंह धोनीसाठी गुरुवारचा दिवस चांगला ठरला नाही.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 7 - आयपीएलमध्ये प्रथमच कर्णधारपदाशिवाय खेळणा-या महेंद्रसिंह धोनीसाठी गुरुवारचा दिवस चांगला ठरला नाही. धोनीच्या रायजिंग पुणे सुपरजायंटस संघाने अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला खरा, पण धोनीला त्याच्या वर्तनासाठी सामनाधिका-यांकडून चारशब्द ऐकून घ्यावे लागले. सामन्या दरम्यान आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल सामनाधिकारी मनू नय्यर यांनी धोनीला बोलवून समज दिली. 
 
धोनीचे वर्तन दंड करण्याइतपत मोठे नसले तरी, खेळभावनेला तडा देणारे असल्याने धोनीला समज देण्यात आली. दक्षिण आफ्रिकेचा लेग स्पिनर इम्रान ताहीरने टाकलेला चेंडू मुंबई इंडियन्सच्या किरेन पोलार्डच्या पॅडवर लागला. त्यावर पुणे संघाने पायचीतचे अपील केले. पण पंच एस रवी यांनी अपील फेटाळून लावले. 
 
त्यावर धोनीने डीआरएसचा कौल मागणारे हातवारे केले. वास्तविक आयपीएलमध्ये डीआरएस तंत्रज्ञानाचा वापर केला जात नाही. धोनीचे हे वर्तन आक्षेपार्ह वाटल्याने त्याला सामनाधिका-यांनी बोलवून समज दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंचांचा निर्णय नाही पटला तर, डीआरएस सिस्टीमव्दारे पुन्हा दाद मागता येते. 
 
नुकत्याच संपलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने डीआरएसचा कौल घेण्यापूर्वी पॅव्हेलियनकडे मदत मागितली होती. विराट कोहलीने यावर टीका केल्यानंतर हा वाद बराच गाजला होता. हाच स्मिथ पुणे संघाचा कर्णधार आहे.