कोलकाता : आंतरराष्ट्रीय स्थरावर फुटबॉल खेळामध्ये भारताची कुणी खिजगणतीही करत नाही. जागतिक क्रमवारीत 158व्या क्रमांकावर विराजमान असलेल्या भारताचा ‘स्लीपिंग जायंट’ (झोपलेला राक्षस) असा उल्लेख फिफाकडून वारंवार करण्यात येतो. या सर्व बाबी खोडून काढण्याची आणि भारतीय फुटबॉलच्या नव्या अध्यायाचा प्रारंभ उद्या, रविवारी होत आहे. इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) निमित्ताने भारत फुटबॉल वतरुळात ऐतिहासिक झेप घेण्यासाठी सज्ज झाला आहे. उद्या कोलकाताच्या साल्ट लेक स्टेडियमवर अॅटलेटिको डे कोलकाता आणि मुंबई सिटी एफसी या दोन संघाच्या लढतीने या नव्या अध्यायाचो पहिले पान लिहिले जाणार आहे. अर्थात त्याला जोड असेल ती बॉलिवुड स्टार्सची उपस्थिती आणि माजी वल्र्डकप विजेत्या खेळाडूंच्या मार्गदर्शनाची.
गेल्या दोन एक वर्षापासून केवळ कागदावर असलेली ही संकल्पना रविवारी प्रत्यक्षात उतरणार असल्याने केवळ भारतातल्या फुटबॉल प्रेमींमध्येच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्थरावरही या लीगबाबत चर्चा आहे. या लीगच्या यशानंतर क्रिकेटवेडय़ा देशात फुटबॉलची क्रेझ वाढल्यास आश्चर्य वाटायला हरकत नाही. या स्पध्रेत पाच वल्र्ड कप विजेते खेळाडू आणि ब्राङिालीयन लेजंड ङिाको प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. केवळ माजी फुटबॉलपटूच या लीगशी जोडलेले नाहीत, तर बॉलिवुड सेलेब्रिटी अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, जॉन अब्राहम, वरुण धवन, हृतिक रोशन आणि माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर व आजी क्रिकेटस्टार विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी हेही लीग यशस्वी करण्यासाठी प्रय}शील आहेत. गांगुली सहमालक असलेल्या कोलकाता संघाला घरच्या मैदानावर रणबीर कपूरच्या मुंबई सिटीशी रविवारी भिडावे लागणार आहे. या दोन संघांव्यतिरिक्त गुवाहाटी, कोची, पुणो, चेन्नई, गोवा व दिल्ली या शहरांच्या संघांचाही समावेश आहे.