शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याचा अंतिम फेरीत ‘सुंदर’ प्रवेश

By admin | Updated: May 17, 2017 04:16 IST

पुन्हा एकदा मोक्याच्यावेळी फलंदाजांनी कच खाल्ल्याने मुंबई इंडियन्सला यंदाच्या सत्रात तिसऱ्यांदा रायझिंग पुणे सुपरजायंट्सविरुध्द पराभव पत्करावा लागला.

- रोहित नाईक । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पुन्हा एकदा मोक्याच्यावेळी फलंदाजांनी कच खाल्ल्याने मुंबई इंडियन्सला यंदाच्या सत्रात तिसऱ्यांदा रायझिंग पुणे सुपरजायंट्सविरुध्द पराभव पत्करावा लागला. गोलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर पुणेकरांना ४ बाद १६२ धावांवर रोखल्यानंतर फलंदाजांच्या अपयशामुळे मुंबईला ९ बाद १४२ धावाच काढता आला. १६ धावांत तीन गडी बाद करणारा वॉशिंग्टन सुंदर सामनावीर ठरला.२० धावांनी मिळविलेल्या या शानदार विजयाच्या जोरावर पुणेकरांनी पहिल्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली. मुंबईकडे अंतिम फेरीसाठी आणखी एक संधी असून एलिमिनेटर सामन्यातील विजेत्याविरुध्द खेळून ते अंतिम फेरीसाठी प्रयत्न करतील. पुण्याने दिलेल्या १६३ धावांचा पाठलाग करताना मुंबईचा डाव मर्यादित राहिला. सलामीवीर पार्थिव पटेलचा अपवाद वगळता मुंबईचा एकही स्टार फलंदाज चमकला नाही. पार्थिवने एकाकी झुंज देताना ४० चेंडूत ३ चौकार व ३ षटकार ठोकताना ५२ धावांची शानदार खेळी केली. मात्र, त्याला इतर कोणत्याही फलंदाजाकडून आवश्यक साथ मिळाली नाही. लेंडल सिमन्स (५), कर्णधार रोहित शर्मा (१), अंबाती रायडू (०), केरॉन पोलार्ड (७), हार्दिक पांड्या (१४) आणि कृणाल पांड्या (१५) अशी मजबूत फलंदाजी स्वस्तात बाद झाली. फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने १६ धावांत ३ महत्त्वाचे फलंदाज बाद करुन मुंबईच्या फलंदाजीला सुरुंग लावला. त्याने सहाव्या षटकात रोहित आणि रायडू यांना बाद करुन मुंबईच्या फलंदाजीतली हवाच काढली. यानंतर पुणेकरांनी ठराविक अंतराने मुंबईला धक्के दिले. तसेच, मुळचा मुंबईकर असलेल्या शार्दुल ठाकूरने १५व्या षटकात कृणाल पांड्या आणि स्थिरावलेल्या पार्थिवला बाद करुन सामना पुर्णपणे पुण्याच्या बाजूने झुकवला. तत्पूर्वी, प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या पुण्याची सुरुवात खराब झाली. निर्धारीत २० षटकात ४ बाद १६२ धावांवर रोखून मुंबईकर गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. पहिल्या व दुसऱ्या षटकात अनुक्रमे राहुल त्रिपाठी आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ बाद झाल्याने त्यांची २ बाद ९ धावा अशी अवस्था झालेली. यावेळी, मुंबईकरांनी आणखी तिखट मारा करताना पुणेकरांची आक्रमकता रोखली. परंतु, अजिंक्य रहाणे - मनोज तिवारी यांनी ८० धावांची मोलाची भागीदारी करुन पुण्याला सावरले. या दोघांनी शानदार अर्धशतक झळकावले. रहाणेने ४३ चेंडूत ५ चौकार व एका षटकारासह ५६ धावा केल्या. तसेच, मनोजने ४८ चेंडूत ४ चौकार व २ षटकारांसह ५८ धावा केल्या. रहाणे बाद झाल्यानंतर महेंद्रसिंग धोनीने अखेरच्या काही षटकात केलेल्या जोरदार हल्ल्याच्या जोरावर पुण्याने दिडशेचा टप्पा ओलांडला. धोनीने २६ चेंडूत ५ षटकरांसह दिलेला नाबाद ४० धावांचा तडाखा सामन्यात निर्णायक ठरला. धोनी चाहत्याची मैदानात धाव...पुण्याने मुंबईविरुध्द विजय मिळवल्यानंतर माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या एका चाहत्याने रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा झेंडा घेऊन मैदानात धाव घेतली. यावेळी त्याला पकडण्यासाठी सुरक्षारक्षकांनीही धाव घेतली. त्या चाहत्याने खेळपट्टीजवळ धोनीच्या पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत सुरक्षारक्षकांनी त्याला पकडल्याने त्याचे प्रयत्न फसले. यावेळी त्या चाहत्याला सुरक्षारक्षकांनी पकडून मैदानाबाहेर नेले. संक्षिप्त धावफलकरायजिंग पुणे सुपरजायंट्स: २० षटकांत ४ बाद १६२ धावा.(अजिंक्य रहाणे ५६,मनोज तिवारी ५८, महेंद्रसिंग धोनीनाबाद ४०, मॅक्लेनघन, मलिंगा, कर्ण शर्मा प्रत्येकी एक बळी.)मुंबई इंडियन्स:२० षटकांत ९ बाद १४२ धावा.(पार्थिव पटेल ५२,कुणाल पांड्या १५, हार्दिक पांड्या १४,मॅक्लेनघन १२, बुमराह नाबाद १६, वॉशिंग्टन सुंदर ३/१६, शार्दुल ठाकूर ३/३७, जयदेव उनाडकट, फर्ग्यूसन प्रत्येकी एक बळी.)