शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

बीसीसीआयचा मदतीचा प्रस्ताव

By admin | Updated: December 1, 2014 01:42 IST

बीसीसीआयने (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) आॅस्ट्रेलियन फलंदाज फिलिप ह्यूजच्या दु:खद मृत्यूमुळे शोकाकूल असलेल्या आॅस्ट्रेलियन संघातील खेळाडूंना

मुंबई : बीसीसीआयने (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) आॅस्ट्रेलियन फलंदाज फिलिप ह्यूजच्या दु:खद मृत्यूमुळे शोकाकूल असलेल्या आॅस्ट्रेलियन संघातील खेळाडूंना या धक्क्यातून सावरण्यासाठी मदत करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. आॅस्ट्रेलियन खेळाडू व काही भारतीय खेळाडूंसोबत अनौपचारिक चर्चा घडवून आणण्याचा प्रस्ताव बीसीसीआयने क्रिकेट आॅस्ट्रेलियाला दिला आहे.ह्युजच्या पार्थिवावर बुधवारी अंतिम संस्कार होणार आहेत. त्यानंतर गुरुवारपासून ब्रिस्बेनमध्ये भारत व आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यान खेळल्या जाणारा पहिला कसोटी सामना स्थगित करण्यात आला आहे. पहिला कसोटी सामना पूर्वनियोजित कार्यक्रमाच्या तीन दिवसानंतर आयोजित होण्याची शक्यता असून दुसऱ्या व तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान असलेल्या ९ दिवसांचा कालावधी कमी करण्यात येण्याची शक्यता आहे. स्थानिक सामन्यादरम्यान एबोटचा बाऊन्सर ह्युजच्या डोक्यावर आदळला. त्यात ह्युजचे निधन झाले. सर्व भारतीय खेळाडू आॅस्ट्रेलियन मित्रांच्या संपर्कात आहे. त्यामुळे बीसीसीआयने या धक्क्यातून सावरण्यासाठी क्रिकेट आॅस्ट्रेलियाला मदतीचा प्रस्ताव दिला. बीसीसीआयचे एक अधिकारी म्हणाले, ‘आमच्या काही खेळाडूंनी आॅस्ट्रेलियन खेळाडूंसोबत संवाद साधल्यानंतर त्यांना मैदानावर परतण्यास मदत मिळणार असेल तसे करण्याची आमची तयारी आहे. बीसीसीआयने संघातील सर्व खेळाडूंना निरोप दिला आहे की, ज्या खेळाडूंना ह्युजच्या अंतिम संस्काराला उपस्थित राहायचे असेल, त्यांना परवानगी आहे. दरम्यान, स्थगित करण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्याबाबत आगामी २४ तासांमध्ये निर्णय घेण्यात येईल, अशी आशा बीसीसीआयने व्यक्त केली आहे. क्रिकेट आॅस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, विविध भागीदार व खेळाडूंसोबत चर्चा केल्यानंतर सुधारित कार्यक्रम रविवारी तयार करण्यात येईल. (वृत्तसंस्था)