नवी दिल्ली : मुख्य कोच अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यातील मतभेदाची चर्चा रंगली असताना बीसीसीआयने दोघांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी पुढाकार घेण्याचे ठरविले आहे. मागील ७२ तासात ज्या नाट्यमय घाडमोडी घडल्या त्यावरुन भारतीय क्रिकेटचे यशस्वी कोच ठरलेले कुंबळे दुसऱ्यांदा मुलाखत देण्यासाठी येतील का, याविषयी शंका व्यक्त होत आहे. बीसीसीआयचे संयुक्त सचिव अमिताभ चौधरी आणि महाव्यवस्थापक(क्रिकेट संचालन) एम.व्ही. श्रीधर हे आजच बर्मिंघमकडे रवाना झाले. सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी दोघेही कर्णधाराची भेट घेतील. ४ जून रोजी पाकविरुद्धचा सामना संपताच बीसीसीआय कोचपदासाठी मुलाखत सुरू करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कोहली- कुंबळे यांच्यात समेटासाठी बीसीसीआयचा पुढाकार
By admin | Updated: June 1, 2017 00:26 IST