शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बीसीसीआयची एसजीएम स्थगित

By admin | Updated: July 12, 2017 00:37 IST

बीसीसीआयने विशेष आमसभा (एसजीएम) स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : बीसीसीआयने विशेष आमसभा (एसजीएम) स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन व त्यांच्या गटाने नियमांचा हवाला देत एसजीएम आयोजनावर आक्षेप नोंदवला आहे.सहा राज्य संघटनांच्या प्रतिनिधींनी बीसीसीआयचे काळजीवाहू अध्यक्ष सी. के. खन्ना यांना पत्र लिहून सोमवारी बोलाविण्यात आलेली एसजीएम नियमानुसार नसल्याचे म्हटले आहे. आक्षेप नोंदविणाऱ्या राज्य संघटनांमध्ये तमिळनाडू क्रिकेट संघटना, अपात्र अधिकारी निरंजन शाह यांची सौराष्ट्र क्रिकेट संघटना, कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांची हरियाणा क्रिकेट संघटना, टी. सी. मॅथ्यू यांची केरळ क्रिकेट संघटना, गोवा क्रिकेट संघटना आणि कर्नाटक राज्य संघटना आदींचा समावेश आहे. काळजीवाहू अध्यक्ष खन्ना यांनी यापूर्वीच काळजीवाहू सचिव अमिताभ चौधरी यांना दिलेल्या पत्रामध्ये घटनेनुसार पाऊल उचलण्याची सूचना केली होती. या सर्व संघटनांच्या मते, बोर्डाच्या घटनेनुसार बीसीसीआयची विशेष आमसभा (एसजीएम) बोलविण्यासाठी किमान १० दिवसांपूर्वी सूचना देणे आवश्यक असते. बहुसंख्य संघटना तोडगा काढण्यासाठी एसजीएम बोलाविण्यास व बीसीसीआयच्या विशेष समितीतर्फे करण्यात आलेल्या शिफारशीनुसार लोढा समितीच्या तीन शिफारशींचा अपवाद वगळता उर्वरित शिफारशी लागू करण्याच्या बाजूने आहेत. श्रीनिवासन विरोधी गटाच्या मते, दिवंगत जगमोहन दालमिया यांनी डिसेंबर २००२ मध्ये केवळ दोन दिवसांच्या नोटीसवर एसजीएम बोलाविली होती. पण यात सहभागी झालेले बीसीसीआयचे वरिष्ठ पदाधिकारी म्हणाले, ‘दालमिया यांनी बैठक बोलाविली होती, पण त्यासाठी सर्व सदस्यांची सहमती होती. पण येथे अनेक संघटनांनी आक्षेप नोंदविला आहे. बैठक आयोजित करण्यात आली तर या सर्व संघटना न्यायालयाचे दार ठोठावतील आणि घेतलेल्या निर्णयावर स्टे मिळवू शकतील.’ पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसार एसजीएम सोमवारी सायंकाळी ४.३० वाजता होणार होती. (वृत्तसंस्था)