नवी दिल्ली : बीसीसीआय खासगी संस्था नाही. ती सार्वजनिक काम करीत असल्याने कायद्याच्या कक्षेतच येते. या संस्थेने उत्तरदायी बनायला हवे, या शब्दात केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी बीसीसीआयला माहितीच्या अधिकार कक्षेत आणण्याची सरकारची इच्छा जाहीर केली. युवकांसाठी आयोजित कार्यक्रमात बोलल्यानंतर सोनोवाल म्हणाले,‘सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार बीसीसीआय सार्वजनिक संस्था आहे. यामुळे बीसीसीआयने आपल्या दैनंदिन घडामोडींची माहिती जनतेला द्यावी तसेच आणखी पारदर्शी बनायला हवे.’ आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी सुप्रीम कोर्टाने बीसीसीआय सार्वजनिक काम करीत असल्यामुळे भारतीय संविधानाच्या कलम २२६ नुसार ही संस्था न्यायालयाच्या अधिकार कक्षेत येते तसेच जनतेप्रती उत्तरदायी आहे,असे अलीकडेच निर्देश दिले होते.(वृत्तसंस्था)
कोर्टाच्या आदेशानुसार बीसीसीआयने उत्तरदायी व्हावे : सोनोवाल
By admin | Updated: January 29, 2015 03:09 IST