शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
3
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
4
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
5
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
6
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
7
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
8
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
9
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
10
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
11
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
12
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
13
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ
14
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
15
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
16
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
17
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
18
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
19
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
20
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक

कोच कुंबळे यांना बीसीसीआय ‘निरोप’ देणार?

By admin | Updated: May 26, 2017 03:35 IST

केंद्रीय करार आणि वेतनवाढीबाबत आक्रमक भूमिका घेणारे टीम इंडियाचे मुख्य कोच अनिल कुंबळे यांना निरोप देण्याची बीसीसीआयने पूर्ण तायरी केल्याचे संकेत मिळाले आहेत.

नवी दिल्ली : केंद्रीय करार आणि वेतनवाढीबाबत आक्रमक भूमिका घेणारे टीम इंडियाचे मुख्य कोच अनिल कुंबळे यांना निरोप देण्याची बीसीसीआयने पूर्ण तायरी केल्याचे संकेत मिळाले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी संपताच संपणाऱ्या त्यांच्या कराराचे नूतनीकरण करायचे नाही, असा पवित्रा घेणाऱ्या बीसीसीआयने गुरुवारी नव्या मुख्य कोचपदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली. ३१ मेपर्यंत अर्ज मागितले असून, सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांची सल्लागार समिती इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहे. बीसीसीआयने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार नि:पक्ष तसेच पारदर्शक प्रक्रियेसाठी प्रशासकांच्या समितीचा एक प्रतिनिधी क्रिकेट सल्लागार समितीच्या कामावर नजर ठेवणे गरजेचे आहे. सध्याचे कोच कुंबळे यांना थेट मुलाखत देण्याची मुभा देण्यात आली आहे. बीसीसीआयच्या आजच्या घोषणेनुसार बोर्डाचे दिग्गज अधिकारी कुंबळे यांच्या कार्यशैलीवर खूष नाहीत, हे स्पष्ट झाले. कुंबळे यांनी खेळाडूंचा करार आणि वेतन यांत वाढ करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. त्यांची हीच भूमिका बोर्डाला आवडलेली नाही. दुसरीकडे कोच या नात्याने कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने १३ पैकी १० कसोटी सामने जिंकले. याशिवाय, विंडीजमध्ये कसोटी मालिकादेखील जिंकली होती. बोर्डाच्या एका अधिकाऱ्यानुसार सध्याचे मुख्य कोच म्हणून कुंबळे शर्यतीत आहेत; पण त्यांचे स्थान निश्चित नाही. संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडमध्ये पोहोचताच कोचपदासाठी अर्ज मागवून बोर्डाने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. चॅम्पियन्स ट्रॉफी संपेपर्यंत बीसीसीआयला प्रतीक्षा करता आली असती; पण अर्ज मागवून कुणीही स्वत:चे स्थान अबाधित समजू नये, हा संदेश बोर्डाने दिला.कुंबळे यांच्या मागण्या समजण्यापलीकडच्या आहेत. ते खेळाडूंना पुढे करून स्वत:चे वेतन वाढवून घेऊ इच्छितात. बीसीसीआयने त्यांच्याजागी कोणा दुसऱ्याची नियुक्ती केल्यास नवे कोच अशी मागणी करणार नाहीत. कुंबळे यांनी कोहलीची मागणी स्वत: रेटली. त्यांच्या मते, कर्णधारपदाचा भार सांभाळण्यासाठी कोहलीला २५ टक्के अतिरिक्त रक्कम मिळायलाच हवी. मुख्य कोच म्हणून त्यांना निवड समितीतदेखील स्थान हवे आहे. कुंबळे यांची मागणी लोढा समितीच्या शिफारशींविरोधात आहे. निवड समितीत तीनच सदस्य असतील, असे लोढा समितीने आधीच स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)