शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

बीसीसीआय मान्यताप्राप्त क्रीडा संघटना नाही : क्रीडामंत्री सोनोवाल

By admin | Updated: July 31, 2015 03:07 IST

सर्वांत धनाढ्य क्रिकेट संस्था असलेल्या बीसीसीआयला केंद्र शासनाची मान्यता नसल्याची स्पष्टोक्ती केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी संसदेत दिली.

नवी दिल्ली : सर्वांत धनाढ्य क्रिकेट संस्था असलेल्या बीसीसीआयला केंद्र शासनाची मान्यता नसल्याची स्पष्टोक्ती केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी संसदेत दिली.भाजपचे महाराष्ट्रातील सदस्य रावसाहेब दानवे यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात सोनोवाल यांनी लोकसभेत ही माहिती दिली. देशात क्रिकेटला अत्याधिक महत्त्व दिले जात असल्याने अन्य खेळांकडे दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला होता. यावर मंत्री म्हणाले, ‘बीसीसीआय मान्यताप्राप्त क्रीडा संस्था नाही.’ सरकारने बीसीसीआयला कुठलीही आर्थिक मदत करीत नसल्याचे सांगून सोनोवाल म्हणाले, ‘बीसीसीआय कुठल्याही स्वरूपाचे शासकीय अनुदान घेत नसल्याने माहितीच्या अधिकार कक्षेत येण्याची बीसीसीआयची तयारी नाही.’विशेष असे की २०१४ मध्ये राज्यसभा सदस्यांनी बीसीसीआयला माहिती अधिकाराच्या कक्षेत आणण्याचा आग्रह धरला होता. यावर क्रीडा मंत्रालयाने हे प्रकरण केंद्रीय माहिती आयोगाकडे (सीआयसी) प्रलंबित असल्याची माहिती सभागृहाला दिली होती. त्याआधी जुलै २०१३ला सीआयसीने बीसीसीआयला नोटीसही बजावली; पण बीसीसीआयने मद्रास उच्च न्यायालयातून अंतरिम स्थगिती मिळविली होती, असेही सोनोवाल यांनी सभागृहाला सांगितले. (वृत्तसंस्था) बीसीसीआयला सरकारने अधिकृत क्रीडा संघटना म्हणून मान्यता दिलेली नाही. ही संस्था आयसीसीच्या मान्यतेअंतर्गत देशात क्रिकेटचा प्रचार करते. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाची भूमिका ही देशात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यासाठी परवानगी देण्यापर्यंत मर्यादित आहे. राष्ट्रीय क्रिकेट संघ परदेशात खेळत असेल तर तो खर्चदेखील मंत्रालय करीत नाही. सरकारचे काम गृह आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून परवानगी मागून देण्याइतपत मर्यादित आहे. - सर्वानंद सोनोवाल, क्रीडामंत्री