शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

बीसीसीआयला नकोय ‘हॉक आय’

By admin | Updated: August 31, 2016 19:51 IST

पायचितच्या निर्णयासाठी वापरण्यात येणारे ‘हॉक आय’ तंत्र विश्वासार्ह नसल्यामुळे हे तंत्र नकोय, या शब्दात बीसीसीआयने विरोध दर्शविला आहे. पंचांच्या निर्णयाची समीक्षा

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ३१ -  पायचितच्या निर्णयासाठी वापरण्यात येणारे ‘हॉक  आय’ तंत्र विश्वासार्ह नसल्यामुळे हे तंत्र नकोय, या शब्दात बीसीसीआयने विरोध दर्शविला आहे. पंचांच्या निर्णयाची समीक्षा प्रणाली(डीआरएस) मात्र काही बदलांसह स्वीकारण्याची आमची तयारी असेल, असे बोर्डाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी बुधावारी स्पष्ट केले.क्रिकेट सामन्यातील काही सुधारणांसह डीआरएस स्वीकारण्यास आम्ही तयार आहोत पण पायचितच्या निर्णयासाठी असेलले ‘हॉक आय’ हे तंत्र आम्हाला मान्य नाही.डीआरएसमधील काही नियम चांगले पण काही मुळीच स्वीकारार्ह नसल्याने यातीलचांगले नियम स्वीकारण्याची आमची तयारी असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.फ्लोरिडा येथे भारत-विंडीज यांच्यात झालेल्या दोन टी-२० दरम्यान उपस्थित राहिलेले ठाकूर ‘क्रिकइन्फो’शी बोलताना म्हणाले,‘हॉक आय’ प्रणाली शंभर टक्के विश्वासार्ह नसल्याने आम्ही या प्रणालीचे समर्थन करणार नाही. ‘हॉटस्पॉट’आणि ‘स्रिको’सारख्या प्रणालीच्या वापराबद्दल मात्र त्यांनी सकारात्मकता दाखविली. आयसीसीने काही महिन्यांआधी बोस्टनमध्ये एमआयटी तज्ज्ञांना डीआरएस प्रणालीची समीक्षा करण्यास तसेच त्याच्या प्रभावाबद्दलचा अहवाल मागितला होता. भारतीय संघाचे सध्याचे कोच आणि आयसीसी क्रिकेट समिती प्रमुख अनिल कुंबळे हे या समितीत आहेत. आयसीसीकार्यकारी समिती अहवालाची समीक्षा करणार आहे. बीसीसीआय डीआरएसच्या काही वादग्रस्त निर्णयावर चर्चा करण्यास तयार आहे.बीसीसीआय प्रमुख पुढे म्हणाले,‘आयसीसीला मी आधीही विचारणा केली की डीआरएस शंभर टक्के विश्वसनीय आहे काय, त्यांचे उत्तर होते नाही. मी नंतर विचारले की सुधारणेस वाव आहे काय, तेव्हा उत्तर आले होय! एमआयटी यावर अहवाल देणारआहे पण सध्यातरी आम्ही पूर्णपणे आश्वस्त नाही.बीसीसीआयने डीआरएसचा वापर आयपीएलमध्ये करण्याचे ठरविले होते. ठाकूर यांनी भविष्यात डीआरएसचा वापर स्थानिक आणि आंतरराष्टÑीय क्रिकेटमध्ये करण्याचा विचार होऊ शकतो. पण पायचितच्या निर्णय तंत्रातील उणिवा दूर होईपर्यंत हॉकआय स्वीकारण्याचा प्रश्नच नाही. पायचितचा निर्णय वगळून डीआरएसचा वापर करण्यास बीसीसीआयची हरकत नाही, हे मी आधीही म्हटले आहे. मानवी चुका होत आहेत पण मशीनने त्याच चुकांची पुनरावृत्ती केल्यास तंत्राचा वापर खेळासाठी उपयुक्त ठरेल का, हा प्रश्न स्वत:ला विचारायला हवा, असे सांगितले.

चार दिवसांची कसोटी व्यवहार्य नाही!कसोटी हा प्रकार लोकप्रिय करण्यासाठी पाच ऐवजी चार दिवसांचा सामना केला तरी कुठलाही तोडगा निघणार नसल्याची प्रतिक्रिया बोर्डाचे सचिव अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केली.कसोटी सामन्यांचे दिवस कमी करून काही साध्य होणार नाही. उलट कसोटी क्रिकेटमधील उणिवा दूर करण्यावर भर द्यायला हवा. कसोटी पाहण्यासाठी लोकांची गर्दी का उसळत नाही, यामागील कारणांचा शोध घ्यायला हवा. हॉकी, फुटबॉल, रग्बी आणि टी-२० क्रिकेट देखील दोन किंवा तीन तासांत संपतात. उलट कसोटी सामने तासन्तास चालतात हे मूळ कारण आहे. चाहत्यांना एकाच जागी बसायला आपण भाग पाडू शकत नाही. त्यांना काय पहायला आवडेल ही त्यांची चॉईस आहे.दिवस-रात्रीची कसोटी खेळविण्याबाबत विचारताच ठाकूर यांनी सध्यातरी तसा विचार नसल्याचे सांगितले. सध्या ट्रायल सुरू असून भारतीय परिस्थितीत गुलाबी चेंडूचा वापर प्राभावी आहे काय, याची समीक्षा होईल, असे ते म्हणाले.