शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
3
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
4
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
5
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
6
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...
7
'जिओ माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका होता'; अंबानींनी का घेतली अब्जावधींची रिस्क? वाचा Inside Story!
8
'तुमच्या मदतीची गरज नाही...', पुतिन यांनी काय ऑफर दिली? डोनाल्ड ट्रम्प यांचा स्पष्ट नकार
9
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
10
Jalgaon Teacher Suicide: खळबळजनक! जळगाव येथील एका शिक्षकाची शाळेच्या वर्गातच आत्महत्या
11
CSK स्टार मुरली विजयी दिग्गज क्रिकेटपटूच्या लेकीला करतोय डेट? Viral Photo मुळे चर्चांना उधाण
12
Kalidas Din 2025: करंगळीच्या बाजूच्या बोटाला 'अनामिका' नाव मिळण्यामागे आहे कालिदासांचा संदर्भ!
13
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
14
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
15
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
16
स्लिपमध्ये अनुभवाची कमी! ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियावर आली लाजिरवाणी वेळ
17
Viral News: काहीही न सांगता कर्मचाऱ्याने सोडला जॉब; एचआर झाली नाराज, लिंक्डइनवर केली 'अशी' पोस्ट!
18
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
19
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
20
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!

प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागविण्याचा बीसीसीआयचा निर्णय

By admin | Updated: June 22, 2017 01:19 IST

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागविण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी क्रिकेट सल्लागार समितीला (सीएसी) वेगवेगळे पर्याय उपलब्ध होतील. अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयने हे पाऊल उचलले आहे. कुंबळे यांच्या कार्यशैलीवर कर्णधार विराट कोहलीने आक्षेप नोंदविल्यानंतर त्यांनी विंडीज दौऱ्यापर्यंत आपला करार वाढविण्यास नकार दिला. या प्रक्रियेसोबत जुळलेल्या बीसीसीआयच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले, की अर्ज सादर करण्यासाठी ७ ते १० दिवसांचा कालावधी देण्यात येण्याची शक्यता आहे. त्यात उच्च पात्रता व दर्जा असलेल्या इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येईल. बीसीसीआयने यापूर्वी पदासाठी अर्ज मागविले होते, त्या वेळी अखेरची तारीख ३१ मे होती. वीरेंद्र सेहवागबाबत विचारले असता हा अधिकारी म्हणाला, ‘‘अधिक अर्ज मागविण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाचे सेहवागच्या अर्जासोबत काही देणेघेणे नाही. प्रशिक्षक कोण असेल, याचा निर्णय शेवटी सीएसीला घ्यायचा आहे. जेवढे अधिक पर्याय असतील, तेवढा योग्य उमेदवार निवडता येईल.’’ आतापर्यंत सेहवाग, मुडी, राजपूत, रिचर्ड पायबस आणि डोडा गणेश यांनी या पदासाठी अर्ज केला आहे. आॅस्ट्रेलियाचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक क्रेग मॅकडरमॉट यांनीही अर्ज केला होता; पण वेळेवर न पोहोचल्यामुळे त्यांचा अर्ज रद्द करण्यात आला. (वृत्तसंस्था)