शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बीसीसीआयची आयसीसीकडे तक्रार

By admin | Updated: March 10, 2017 06:29 IST

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ व पीटर हँड्सकोम्ब यांच्याविरुद्ध डीआरएससाठी ड्रेसिंग रुमकडून मदत

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ व पीटर हँड्सकोम्ब यांच्याविरुद्ध डीआरएससाठी ड्रेसिंग रुमकडून मदत मागितल्याच्या प्रकरणात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) गुरुवारी अधिकृत तक्रार केली. आयसीसीने बुधवारी भारतीय कर्णधार विराट कोहली व आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथ यांच्याविरुद्ध कुठलीही कारवाई करणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर बीसीसीआयने आज घेतलेला निर्णय आश्चर्यचकित करणारा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयने कागदपत्रांसह या घटनेचे व्हीडिओ फुटेज आयसीसीला ई-मेल केले असून, जागतिक क्रिकेटचे संचालन करणाऱ्या संस्थेच्या आचारसंहितेनुसार लेव्हल दोनचा आरोप निश्चित करण्यास सांगितले आहे. बीसीसीआयच्या नजिकच्या सूत्राने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की,‘बीसीसीआयने गुरुवारी स्मिथ व हँड्सकोम्बाविरुद्ध आयसीसीकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. हँड्सकोम्ब रिव्ह्यू घेण्यासाठी ड्रेसिंग रुमची मदत घेण्याचा इशारा करीत असून, पंच नायजल लाँग हस्तक्षेप करीत असल्याचे व्हीडिओ फुटेज आयसीसीला पाठविण्यात आले आहे.’सूत्राने पुढे सांगितले की,‘बीसीसीआयला अधिकृत तक्रार दाखल करण्याचा अधिकार असून, त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर केला आहे. कारण लेव्हल दोनच्या आरोपाची तक्रार सामना संपल्यानंतर ४८ तासांच्या आत दाखल करता येते.’बीसीसीआयने खिलाडूवृत्तीची पायमल्ली करणे आणि खेळाला बदनाम करणे, असे आरोप लावले असल्याचे सूत्राने स्पष्ट केले. आयसीसी या तक्रारीची दखल घेणार का, याबाबत बोलताना सूत्राने सांगितले की,‘नियमानुसार सदस्य बोर्डाच्या सीईओला लेव्हल दोनच्या आरोपाच्या प्रकरणात ४८ तासांच्या आत तक्रार दाखल करता येते. बीसीसीआयने त्याच अधिकाराचा वापर केला. या व्यतिरिक्त पीटर हँड्सकोम्बने आपल्या अधिकृत टिष्ट्वटर हँडलवर आपली चूक कबूल केली आहे. या व्यतिरिक्त आयसीसीने ४८ तास प्रतीक्षा का केली.’क्रिकेट आॅस्ट्रेलियाने स्मिथची पाठराखण करण्यासाठी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे बीसीसीआय नाराज असल्याचे वृत्त आहे. बीसीसीआयच्या मते आपल्या कर्णधाराची पाठराखण करणे योग्य आहे, पण त्यांचे वक्तव्य कोहलीला कमी लेखणारे आहे. आॅस्ट्रेलियन बोर्डाचे हे वक्तव्य यजमान संघाला रुचलेले नाही. भारतीय संघव्यवस्थापनाला आशा होती की, सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड सामना संपल्यानंतर स्मिथला बोलावतील व कारवाई करतील, पण तसे घडले नाही. ब्रॉड यांनी आॅस्ट्रेलियन मीडियाला दिलेले वक्तव्य बीसीसीआयला रुचले नाही. कारण सामनाधिकाऱ्यांना आपले मत प्रसारमाध्यमांकडे व्यक्त करता येत नाही. आयसीसी आता अडचणीच्या स्थितीत आहे. कारण दुसऱ्या कसोटी सामन्याच्या मैदानी पंचानी बुधवारपर्यंत अधिकृत तक्रार दाखल केलेली नव्हती. (वृत्तसंस्था)