शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

बीसीसीआयचा विरोध कायम आयसीसीची बदलास मंजुरी

By admin | Updated: February 5, 2017 04:01 IST

बीसीसीआयचे प्रतिनिधी विक्रम लिमये यांनी कडाडून विरोध केला असला तरी आयसीसी बोर्डाच्या अनेक सदस्यांनी पुनर्गठित महसूल वितरण मॉडेलच्या बाजूने मतदान केले.

नवी दिल्ली : बीसीसीआयचे प्रतिनिधी विक्रम लिमये यांनी कडाडून विरोध केला असला तरी आयसीसी बोर्डाच्या अनेक सदस्यांनी पुनर्गठित महसूल वितरण मॉडेलच्या बाजूने मतदान केले. विश्वासनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताला केवळ श्रीलंकेने पाठिंबा दिला. हा प्रस्ताव मतदानासाठी ठेवण्यात आला, त्यावेळी झिम्बाब्वेचे प्रतिनिधी अनुपस्थित होते. पाकिस्तान, न्यूझीलंड, द. आफ्रिका, वेस्ट इंडिज, इंग्लंड व आॅस्ट्रेलिया या सर्व सदस्यांनी महसूल वितरणाच्या पद्धतीमध्ये बदल करण्याच्या बाजूने मतदान केले. आयसीसी बोर्डाने शनिवारी महसूल वितरणाच्या पद्धतीमध्ये बदल करण्याच्या मुद्यावर चर्चा केली. त्यात भारत, इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया या ‘बिग थ्री’ बोर्डांना महसुलामध्ये मोठा वाटा मिळत होता. ‘बिग थ्री’ मॉडेलला कसोटी खेळणाऱ्या अन्य देशांच्या बोर्डांसह इंग्लंड व आॅस्ट्रेलियानेही विरोध केला. लिमये यांनी सांगितले, की ‘मी बोर्डाला स्पष्ट केले, की अधिकृत नोंद असलेल्या कागदपत्रांचे समर्थन करू शकत नाही. हे कागदपत्र विश्वास व समानतेवर आधारित आहेत. मी आत्ताच कार्यभार सांभाळलेला असून कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी मला वेळ आवश्यक आहे. त्यामुळे सदस्य व अध्यक्षांना माझ्याबाबत सहानुभूती आहे.’लिमये पुढे म्हणाले, ‘अध्यक्ष शशांक मनोहर म्हणाले, की ते अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा करीत आहेत. हा मुद्दा मतदानासाठी ठेवण्यात आला आणि मी बदलाच्या विरोधात मतदान केले. बैठकीच्या अहवालामध्ये याचा उल्लेख आहे. मी कुठल्या बाजूने मतदान केले, हे सांगणे योग्य नाही.’आयसीसी एप्रिल महिन्यात बोर्डाच्या बैठकीदरम्यान हा प्रस्ताव पारित करणार आहे. दरम्यान, या प्रस्तावानंतरही बीसीसीआयला दोन हजार कोटींपेक्षा अधिक राशी मिळण्याची आशा आहे. (वृत्तसंस्था)