शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

बंगाल वॉरियर्सचा झुंजार विजय

By admin | Updated: February 5, 2016 03:40 IST

बंगाल वॉरियर्सने लढवय्या खेळ करताना पिछाडीवरून बाजी मारत बंगळुरू बुल्सला ३४-२४ असा धक्का देऊन प्रो कबड्डीच्या तिसऱ्या सत्रात सलग दुसरा

बंगळुरू : बंगाल वॉरियर्सने लढवय्या खेळ करताना पिछाडीवरून बाजी मारत बंगळुरू बुल्सला ३४-२४ असा धक्का देऊन प्रो कबड्डीच्या तिसऱ्या सत्रात सलग दुसरा विजय नोंदवला. बंगालने गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली असून, बंगळुरूची ७व्या स्थानी घसरण झाली. विशेष म्हणजे सलग दुसऱ्यांदा बंगळुरूला घरच्या मैदानावर हार पत्करावी लागली.श्री कांतीरवा स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात यजमानांनी मध्यांतरापर्यंत वर्चस्व राखले होते. चौथ्या मिनिटापासून घेतलेली आघाडी यजमानांनी ३०व्या मिनिटापर्यंत कायम राखली होती. मात्र येथून बंगालच्या कोरियन आक्रमक जँग कुन ली याने धडाकेबाज चढायांच्या जोरावर सामन्याचे चित्र पालटले.मध्यांतराला बंगळुरूने १३-१२ अशी एका गुणाची नाममात्र आघाडी घेतली होती. या वेळी काहीसे आक्रमक झालेल्या यजमानांनी बंगळुरूवर लोण चढवण्याच्या तब्बल तीन संधी वाया घालवल्या. दखल घेण्याची बाब म्हणजे बंगळुरूचा सुरजीत नरवाल दोन वेळा एकटाच मैदानात होता. तरीही त्याने सुपर टॅकेल करून संघाची गुणसंख्या वाढवली. या वेळी बंगळुरू बाजी मारणार असे चित्र होते. मात्र बंगालने आक्रमणाची धार वाढवताना बंगळुरूवर लोण चढवला. हाच सामन्यातील टर्निंग पॉइंट ठरला.३१व्या मिनिटापासून घेतलेली आघाडी बंगाल वॉरियर्सने अखेरपर्यंत टिकवली. कून लीने खोलवर चढाया करताना बंगळुरूचा बचाव पूर्णपणे भेदला. सामना संपण्यास ५ मिनिटे शिल्लक असताना त्याने दोन गुणांची कमाई केली. बंगालने ३९व्या मिनिटाला बंगळुरूवर दुसरा लोण चढवून विजयावर शिक्कामोर्तब केले. लीसह नितीन तोमरचे आक्रमण आणि नीलेश शिंदे व गिरीश एर्नाक यांचा भक्कम बचाव बंगालच्या विजयात मोलाचे ठरले. तर यजमानांकडून अमित राठी, सुरजीत नरवाल व सोमवीर यांची झुंज अपयशी ठरली.