बास्केटबॉल स्पर्धा
By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST
अखिल घाटे स्मृती राज्यस्तर बास्केटबॉल स्पर्धा
बास्केटबॉल स्पर्धा
अखिल घाटे स्मृती राज्यस्तर बास्केटबॉल स्पर्धानासा, एसएनजी, डीकेएम एनबीआयएस उपांत्यपूर्व फेरीतनागपूर : यजमान नागपूर ॲमेच्युअर स्पोर्टस् असोसिएशन (नासा), शिवाजीनगर जिमखाना (एसएनजी), धरमपेठ क्रीडा मंडळ (डीकेएम), आणि नुतन भारत युवक संघाने (एनबीवायएस) संघांनी सुरेंद्र नगर येथे सुरू असलेल्या अखिल घाटे स्मृती राज्यस्तर बास्केटबॉल स्पर्धेची गुरुवारी उपांत्यपूर्व फेरी गाठली. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी सर्व उपांत्यपूर्व सामने खेळविण्यात आले. पहिल्या लढतीत अमरावती संघाने अमरावती पोलीस संघावर ६५-६३ असा निसटता विजय नोंदविला. एसएनजी अ संघाने जीकेएमचा ३९-१८ ने पराभव केला. डीएकेएमने विहंग तापसच्या २६ गुणांच्या बळावर शहर पोलीस बॉईजचा ७८-४३ अशा फरकाने पराभव केला. अनुप आणि तुषार मस्के या भावनडांच्या चमकदार कामगिरीच्या बळावर एनबीवायएस अ संघाने नासा ब संघाचे आव्हान ७६-४१ ने संपुष्टात आणले. वर्धा पोलिसकडून एनबीवायएस ब संघ ४५-२३ ने पराभूत झाला. नासा अ ने एचकेएमला ५३-३६ अशा फरकाने नमविले. नांदेड संघाने यवतमाळचा ८९-३९ अशा मोठ्या फरकाने पराभव केला.(क्रीडा प्रतिनिधी).....................................................................................टेनिस बॉल क्रिकेट : महाराष्ट्र संघ जाहीरनागपूर : बिहारमधील दरभंगा येथे आयोजित १९ व्या राष्ट्रीय कनिष्ठ गट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे मुलामुलींचे संघ जाहीर करण्यात आले आहेत. नाशिक येथे झालेल्या राज्य स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे संघटनेचे सचिव मोहम्मद बाबर आणि उपाध्यक्ष प्रा. बाबुलाल धोत्रे यांनी खेळाडूंच्या नावाची घोषणा केली.महाराष्ट्र संघ :- मुले- अब्दुल रझ्झाक, रुद्रेश कुऱ्हे, अपेक्षित वरुणकर, मो. जावेद इक्बाल, अनुराग जोहरी, प्रणित बावरे, मो. कामिल तरय्या, प्रथमेश पवार, आशिष सरडे, ऋषिकेश शिंदे, प्रतीक पाटील, संकेत चव्हाण,शेख नबी, हबीब पठाण, मकरंद काकडे, मच्छिंद्र सपकाळ, सचिन शेट्टी, अक्रम फिरोझ, संकेत महानुभाव, यश जगले, नितीन जयराम, आशुतोष कातुरे, प्रद्युम्न काटे, मुकुंद जुनकर व्यवस्थापक आणि आशिष हाडके कोच.मुलींचा संघ: स्नेहा मदने, गौरी तायडे, अदिती देशमुख, ऋतुजा देशमुख, दीक्षा गवई, गौरी ठाकरे, श्रद्धा शेलार, अनुष्का दिवटे, आकांक्षासिंग, क्षितिजा नागर, डिम्पल पवार , कृतिका माळी, मृणाल गुखवे, धनश्री टेटे, रसिका वानखेडे, सुमित गांगुर्डे, मीनाक्षी जाधव व्यवस्थापक, पूजा चौधरी कोच.