दुबई : बांगलादेशाविरुद्ध उद्या (गुरुवार)पासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने बांगलादेशाला ३-० असे पराभूत केले, तरी भारत आयसीसी रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचणार नाही. मात्र, मालिकेत बांगलादेशाने एक जरी विजय मिळविला, तरी २०१७मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तो पात्र ठरण्याची शक्यता आहे.यजमान इंग्लंड व ३० सप्टेंबरला आयसीसी रँकिंगमध्ये पहिल्या सात क्रमांकांच्या संघांना चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी प्रवेश मिळणार आहे. पुढील वर्षी १ ते १९ जून या काळात चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे. बांगलादेश व वेस्ट इंडीजचे सध्या समान ८८ गुण आहेत. मात्र, वेस्ट इंडीजपेक्षा ते एका क्रमांकाने खाली आठव्या क्रमांकावर आहेत. पाकिस्तान ९व्या क्रमांकावर आहे. भारताविरुद्धच्या मालिकेत बांगलादेशाने ३-० असा विजय मिळविल्यास त्यांचे ९६ गुण होतील, तर २-१ असा विजय मिळविल्यात ९३ गुण होणार आहेत. या दोन्ही परिस्थितींत त्यांचे वेस्ट इंडीजपेक्षा गुण जास्त होणार असल्याने बांगलादेश सातव्या क्रमांकावर झेपावेल. भारताने जर बांगलादेशाला ३-० असे पराभूत केले, तर अग्रस्थानी असलेल्या आॅस्ट्रेलिया व भारतात फक्त १० गुणांचेच अंतर राहील. मात्र, अशा स्थितीत बांगलादेश नवव्या क्रमांकावर जाईल. जर भारताने ही मालिका २-१ अशी जिंकली, तर भारताचे गुण ११७च राहतील. न्यूझीलंड सध्या इंग्लंडविरुद्ध पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळत आहे. (वृत्तसंस्था)
बांगलादेशालाच होणार फायदा
By admin | Updated: June 17, 2015 02:01 IST