ढाका : भारताविरुद्ध बुधवारपासून प्रारंभ होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यापूर्वी सोमवारी बांगलादेश क्रिकेट संघाचे व्यवस्थापक खालिद महमूद यांनी कौटुंबिक कारणाचा हवाला देत राजीनामा दिला. महमूद यांनी राजीनामा बीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी निजामुद्दीन चौधरी यांना ई-मेलद्वारे पाठविला असल्याचे सूत्रांनी सांगितले. बीसीबीच्या क्रिकेट संचालन समितीचे प्रमुख मैमूर रहमान यांनी या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला. या मुद्द्यावर महमूदसोबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बांगलादेशाचे माजी क्रिकेटपटू महमूद वेगवान गोलंदाज व मधल्या फळीतील फलंदाज होते. त्यांनी १९९८ ते २००६ या कालावधीत संघाचे प्रतिनिधित्व केले होते आणि २००३ ते २००४ या कालावधीत नेतृत्व केले. (वृत्तसंस्था)
बांगलादेश संघाच्या व्यवस्थापकाचा राजीनामा
By admin | Updated: June 9, 2015 02:21 IST