ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. १७ - विराट कोहलीची कर्णधारपदाला साजेशी खेळी (७९) , त्याला एबी डिविलियर्सने (५५) दिलेली साथ आणि शेन वॉटसनच्या (३३) धावा यांच्या फलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिल्ली डेअर डेव्हिल्ससमोर विजयासाठी १९२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
गेल भोपळाही न फोडता माघारी परतल्यानंतर कोहली आणि डिविलियर्सने सामन्याची सूत्रे हाती घेत दिल्लीची गोलंदाजी फोडून काढली. दोघांनी दुस-या विकेटसाठी १०७ धावांची भागिदारी केली. कोहलीने ४८ चेंडूत ७९ धावा करताना सात चौकार आणि तीन षटकार लगावले.
डिविलियर्सने ३३ चेंडून ५५ धावा फटकावताना नऊ चौकार आणि एक षटकार लगावला. दिल्लीकडून झहीर खान महागडा गोलंदाज ठरला. त्याने चार षटकात ५० धावा देत एक गडी बाद केला.