शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अटीतटीच्या लढतीत बंगळुरूची बाजी

By admin | Updated: April 8, 2017 23:52 IST

शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली डेअरडेव्हिसवर 15 धावांनी मात केली.

ऑनलाइन लोकमत 
बंगळुरू, दि. 8 -  शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली डेअरडेव्हिसवर 15 धावांनी मात केली. 158 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले.  दिल्लीला शेवटच्या षटकात 19 धावांची गरज असताना एकाकी झुंज देणारा रिषभ पंत बाद झाला आणि दिल्लीचे लढतीतील आव्हान संपले. दिल्लीकडून रिषभ पंतचा (57) अपवाद वगळता इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही.  
तत्पूर्वी  कर्णधार झहीर खान आणि ख्रिस मॉरिस केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 157 धावांत रोखले. केदार जाधवचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी निराशा केल्याने बंगळुरूला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. मात्र एक बाजू लावून धरणाऱ्या केदार जाधवच्या 67 धावांच्या जोरावर बंगळुरूने दीडशेपार मजल मारली.  
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यावर बंगळुरूला चांगली सुरुवात करता आली नाही. कर्णधार शेन वॉटसनचा सलामीला येण्याचा प्रयोगही यशस्वी ठरला नाही. ख्रिस गेल (6) लवकर माघारी परतल्यावर बंगळुरूच्या इतर फलंदाजांनीही निराशा केली. त्यामुळे संघाचे अर्धशतक फलकावर लागण्यासाठी आठव्या षटकापर्यंत वाट पाहावी लागली. 
त्यानंतर मात्र केदार जाधवने तुफान फटकेबाजी केली. त्याने अमित मिश्राच्या एका षटकात 24 धावा वसूल केल्या. त्यामुळे बंगळुरू समाधानकारक धावसंख्या उभारेल, असे वाटले. पण केदारला (67) धावांवर बाद करत झहीर खानने बंगळुरूच्या धावसंख्येला ब्रेक लावला. अखेरीस 20 षटकात बंगळुरूला आठ बाद 157 धावाच करता आल्या. दिल्लीकडून मॉरिसने तीन, तर झहीरने दोन बळी टिपले.