शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

बंगलोर एबी ‘पॉझिटिव्ह’

By admin | Updated: May 5, 2014 14:59 IST

युएईमध्ये पडलेला विजयाचा दुष्काळ रॉयल्स चॅलेंर्जस बंगलोरने आपल्या होमग्राउंडवर संपविला. चिन्नास्वामी स्टेडियमवर त्यांनी सनरायर्जस हैदराबाद संघावर ४ विकेट्स आणि १ चेंडू शिल्लक ठेवून मात केली.

बंगलोर : युएईमध्ये पडलेला विजयाचा दुष्काळ रॉयल्स चॅलेंर्जस बंगलोरने आपल्या होमग्राउंडवर संपविला. चिन्नास्वामी स्टेडियमवर त्यांनी सनरायर्जस हैदराबाद संघावर ४ विकेट्स आणि १ चेंडू शिल्लक ठेवून मात केली. एबी डिव्हीलियर्सने ६ चौकार आणि ८ षटकारांसह ४१ चेंडूत तडाखेबंद नाबाद ८९ धावांची खेळी करून सामना खेचून आणला. डिव्हीलियर्स खेळायला आला तेव्हा ३ बाद ३८ अशी संकटमय परिस्थिती होती. त्यात गेल (२७), आणि विराट कोहली (0) तंबूत परतले होते. अशावेळी एबीने ‘पॉझिटिव्ह’ अँप्रोचने तडाखेबंद खेळी करीत रॉयल चॅलेंर्जस बंगलोरला एकहाती सामना जिंकून दिला.बंगलोर संघाने हैदराबाद संघाचा डाव ६ बाद १५५ धावांत रोखला आणि विजयासाठी आवश्यक धावा १९.५ षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना बंगलोर संघाची २ बाद ६ अशी निराशाजनक सुरुवात झाली होती. बंगलोर संघाला अखेरच्या दोन षटकांत विजयासाठी २८ धावांची गरज होती. डावाच्या १९व्या षटकात स्टेनच्या गोलंदाजीवर २४ धावा वसूल करीत बंगलोर संघाने विजय निश्‍चित केला. त्यापैकी २३ धावा डिव्हिलियर्सने वसूल केल्या. अखेरच्या षटकात बंगलोर संघाला विजयासाठी केवळ ४ धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर स्टार्क धावबाद झाल्यामुळे रंगत निर्माण झाली, पण डिव्हिलियर्सने पाचव्या चेंडूवर चौकार वसूल करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. बंगलोरच्या डावात ख्रिस गेल (२७ धावा, १९ चेंडू, ३ चौकार, २ षट्कार), युवराज सिंग (१४ धावा, १ चौकार, १ षटकार) आणि रोसू (१४ धावा, १ चौकार) यांचेही योगदान उल्लेखनीय ठरले. सनरायर्जसतर्फे करण शर्मा (३-१७) व भुवनेश्‍वर कुमार (२-१६) यांचा अपवाद वगळता अन्य गोलंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली. त्याआधी, डेव्हिड वॉर्नरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सनरायर्जस संघाने आव्हानात्मक धावसंख्येची मजल मारली. वॉर्नरने ४९ चेंडूत ४ चौकार व ३ षटकारांच्या साहाय्याने ६१ धावा फटकाविल्या. त्याने कर्णधार शिखर धवनच्या (३७) साथीने तिसर्‍या विकेटसाठी ६१ धावांची तर नमन ओझाच्या (१५) साथीने पाचव्या विकेटसाठी ३४ धावांची भागीदारी केली. बंगलोरतर्फे मिशेल स्टार्क व वरुण अँरोन यांनी अनुक्रमे २१ व ३३ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. (वृत्तसंस्था)