शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

बॅडमिंटनपटू रितिकाने बर्लिनमध्ये सोडविला दहावीचा पेपर

By admin | Updated: March 11, 2017 21:59 IST

युवा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू रितिका ठाकेर दहावीची विद्यार्थिनी आहे. स्थानिक सीडीएस शाळेची ती विद्यार्थिनी.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 11 : युवा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू रितिका ठाकेर दहावीची विद्यार्थिनी आहे. स्थानिक सीडीएस शाळेची ती विद्यार्थिनी. आयुष्याला वळण देणाऱ्या महत्त्वाच्या परीक्षेला मुकायचे नाही आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धादेखील खेळायच्याच, हा निर्धार तिने खरा करून दाखविला. वविविध शासकीय पातळीवरील समन्वय आणि रितिकाची मेहनत यामुळे जर्मनीच्याबर्लिन शहरात दहावीचा पेपर सोडविण्याचे आव्हान रितिका आणि मुंबईतील मालाडच्या रायन इंटरनॅशनल स्कूलची रितिकाची सहकारी खेळाडू सिमरन सिंघी यांनी लीलया पेलले व यशस्वी केले. या दोघींनी पेपर सोडविल्यानंतर सामना खेळला, हे विशेष. शैक्षणिक सत्र वाचविल्याबद्दल तसेच महत्त्वाच्या स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल दोन्ही खेळाडूंचे कौतुक होतआहे.

डच तसेच जर्मन ओपन स्पर्धेसाठी रितिका व सिमरन यांची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. या दोघी क्रमश: दुहेरी आणि मिश्र दुहेरीसाठी संघात आहेत. दोघीही दहावीच्या विद्यार्थिनी असल्याने स्पर्धेच्या मध्येच परीक्षेचा अडथळा आला. १० मार्चला इंग्रजी भाषेचा पेपर होता. मुलीला परीक्षेला मुकावे लागू नये यासाठी रितिकाचे वडील राहुल यांनी सीडीएस स्कूल, नागपूर जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या माध्यमातून राज्य आणि राष्ट्रीय बॅडमिंटन संघटना आदींना त्यांनी विनंती केली. रितिका आणि सिमरन यांच्या शाळेच्या प्राचार्यांनी आयसीएसई बोर्डाला कळवून बर्लिनमध्ये दोन्ही विद्यार्थी पेपर सोडवू शकतील का, यावर मार्गदर्शन मागितले.

आयसीएई बोर्डाने सकारात्मक प्रतिसाद देत बर्लिनमध्ये पेपर सोडविण्याची परवानगी बहाल केली. बीएआय आणि क्रीडा मंत्रालयाने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क साधून बर्लिनमधील भारतीय दूतावासात या दोघींची पेपर सोडविण्यासाठीव्यवस्था केली. दोन्ही विद्यार्थिनींनी पेपर सोडविल्यानंतर स्पर्धेत सामना देखील खेळला. पालक, क्रीडा पदाधिकारी, बोर्ड व शाळा प्रशासन , दूतावास आणि सरकार यांच्या सुंदर समन्वयातून साकार झालेल्या या कामाला यशस्वी केल्याचा आनंद दोन्ही विद्यार्थिंनीसह त्यांच्या पालकांच्याचेहऱ्यांवर ओसंडून वाहत आहे.