शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

बॅडमिंटनपटू सिंधूचे आता लक्ष्य ‘नंबर वन’चे...

By admin | Updated: December 23, 2016 01:23 IST

आॅलिम्पिकमध्ये यंदा मिळवलेले पदक माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाचे यश होते. हे पदक मिळवून मी माझे एक स्वप्न पूर्ण केले आहे

मुंबई : आॅलिम्पिकमध्ये यंदा मिळवलेले पदक माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाचे यश होते. हे पदक मिळवून मी माझे एक स्वप्न पूर्ण केले आहे. त्याचबरोबर मी माझ्या पहिल्या सुपरसीरिज विजेतेपदाच्या प्रतीक्षेत होते आणि यंदा ती प्रतीक्षाही संपली. त्यामुळे हीच कामगिरी कायम ठेवून जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी येण्याचे लक्ष्य मी बाळगले आहे, असा विश्वास भारताची आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने व्यक्त केला.मुंबईत गुरुवारी एका नामांकित जीवन विमा कंपनीने आयोजित केलेल्या ‘क्वेस्ट फॉर एक्सलेन्स’ कार्यक्रमामध्ये सिंधूने आपली प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेल्ला गोपीचंद, किदाम्बी श्रीकांत, पी. कश्यप, समीर वर्मा, सात्विक साईराज, एचएस प्रणय, सिक्कि रेड्डी, गुरुसाई दत्त, सौरव वर्मा आणि भारतीय संघाचे फिजिओ किरण यांचीही उपस्थिती होती. ताज्या जागतिक क्रमवारीनुसार सिंधूने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान मिळवताना ६ व्या क्रमांकावर कब्जा केला आहे. याविषयी ती म्हणाली, ‘मी या यशामुळे खूप आनंदीत आहे. भविष्यात नक्कीच अव्वलस्थान काबीज करण्याचे लक्ष्य आहे. यासाठी मी हळूहळू पुढे जाणार असून एकावेळी एक लक्ष्य साध्य करीन. यात नक्की यशस्वी होईन, अशी आशा आहे.’यंदाचे वर्ष शानदार ठरल्याचे सांगताना सिंधू म्हणाली की, ‘नक्कीच, आॅलिम्पिक स्पर्धा चमकदार ठरली. याआधी अनेक जागतिक स्पर्धेत आपल्याला कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले आहे. त्यामुळेच, यावेळी मला हा इतिहास कसंही करून बदलायचा होता. जपानच्या नोझोमी ओकुहारा (जपान) विरुद्ध यापूर्वी मी अनेकदा पराभूत झाले होते, पण यावेळी तिला सोडायचे नाही असा निर्धार करून सर्वोत्तम खेळ करत अंतिम फेरीत धडक मारली.’ तसेच, ‘आॅलिम्पिकचा उपांत्य सामना सोपा नव्हता. मी पिछाडीवर होते. माझ्यापेक्षा गोपी सरांना त्या सामन्याची स्थिती चांगली कळत होती. त्यामुळे मी केवळ त्यांच्या सूचनांचे पालन करत गेले,’ असेही सिंधूने यावेळी म्हटले. नुकत्याच झालेल्या दुबई वर्ल्ड सुपरसीरिज फायनल्स स्पर्धेबाबत सिंधूने सांगितले की, ‘सुंग जी ह्यूनला नमवून मी चायना ओपनमध्ये बाजी मारली होती. परंतु, दुबईला ती अप्रतिम खेळली. शेवट जय-पराजय हा खेळाचा एक भाग असल्याने हे सर्व विसरुन मी पुढील कामगिरीवर लक्ष केंद्रित केले आहे.’ (क्रीडा प्रतिनिधी)