शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अझलन शाह चषक - न्यूझीलंडचा पराभव करत भारताने जिंकलं कांस्यपदक

By admin | Updated: May 6, 2017 20:04 IST

अझलन शाह चषकात प्लेऑफ लढतीत भारतीय हॉकी संघाने न्यूझीलंडचा पराभव करत कांस्यपदक जिंकलं आहे

ऑनलाइन लोकमत
इपोह, दि. 6 - रुपिंदरपाल सिंगने पेनल्टी कॉर्नरवर नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर भारताने शनिवारी न्यूझीलंडचा ४-० ने पराभव केला आणि २६ व्या सुल्तान अझलान शाह कप हॉकी स्पर्धेत कांस्यपदकाचा मान मिळवला. रुपिंदरने १७ व २७ व्या मिनिटाला ड्रॅग फ्लिकवर न्यूझीलंडचा गोलकिपर रिचर्ड जोयसेला गुंगारा देत गोल नोंदवले.
 
त्यानंतर एस.व्ही. सुनीलने ४८ व्या मिनिटाला या स्पर्धेतील वैयक्तिक पहिला गोल नोंदवला. त्याने मनदीप सिंगने दिलेल्या क्रॉसचा लाभ घेत चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखविला तर तलविंदर सिंगने अखेरच्या मिनिटाला भारतातर्फे चौथा गोल नोंदवला. 
 
त्याआधी, मलेशियाने प्ले ऑफमध्ये जपानचा ३-१ ने पराभव करीत स्पर्धेत पाचवे स्थान पटकावले. गेल्या वर्षी भारताने या स्पर्धेत रौप्यपदक पटाकवले होते तर ऑस्ट्रेलियाने सुवर्णपदकाचा मान मिळवला होता. 
 
भारताला शुक्रवारी साखळीतील अखेरच्या लढतीत मलेशियाविरुद्ध लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती, पण आज मात्र भारतीय संघाची कामगिरी उल्लेखनीय ठरली.
 
याआधी अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला मलेशियावर २ गोल फरकाने विजय मिळवणे आवश्यक होते. त्याआधी सकाळी ग्रेट ब्रिटनने न्यूझीलंडचा ३-२ गोलने पराभव केला; परंतु भारतीय संघ अपेक्षेनुसार कामगिरी करू शकला नाही आणि पराभूत झाला. 
 
भारताने दोन गोलफरकाने विजय मिळवला असता तर ब्रिटनला कांस्यपदकासाठी खेळावे लागले असते; परंतु मलेशियाने जबरदस्त कामगिरी करताना भारतीय संघाच्या अपेक्षेवर पाणी फेरले. आॅस्ट्रेलियाने ९ वेळा सुल्तान अझलन शाह चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे, तर ग्रेट ब्रिटन तब्बल २३ वर्षांनंतर अंतिम फेरीत खेळणार आहे. याआधी ब्रिटनने १९९४ मध्ये एकदा विजेतेपद पटकावले होते.
 
भारतीय स्ट्रायकर मलेशियाचा डिफेन्स भेदू शकले नाही, तर दुसरीकडे मलेशियाने भारतीय सर्कलमध्ये सुरुवातीलाच प्रतिहल्ला केला. मलेशियाला नवव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला; परंतु भारताच्या व्हिडिओ रेफरलमुळे हा निर्णय बदलला गेला.
पहिल्या क्वार्टरमधील सुमार कामगिरीनंतर भारताने दुसऱ्या क्वार्टरमध्ये तीन पेनल्टी कॉर्नर्स मिळवले; परंतु भारताचे गोल करण्याचे प्रयत्न मलेशियाचा गोलरक्षक सुब्रमण्यम कुमार याने हाणून पाडले. मलेशियाकडून ५0 व्या मिनिटाला विजयी गोल शाहरील साबान याने केला.
 
तत्पूर्वी, ब्रिटनने त्यांच्या अखेरच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडवर ३-२ अशी मात केली. ब्रिटनकडून सॅम वाडने नवव्या मिनिटाला, फिल रोपरने ३९ व्या मिनिटाला आणि मार्क ग्लेनहोर्गने ४९ व्या मिनिटाला गोल केले. न्यूझीलंडकडून डोमेनिक न्यूमेनने ३0 व्या मिनिटाला, तर ५८ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर रसेलने गोल केला.