शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात काय?; कारण अद्यापही गुलदस्त्यात
2
रस्ते बंद केले, नेत्यांची धरपकड केली, कार्यकर्त्यांना डांबले तरीही ‘मराठी’ ताकद रस्त्यावर दिसली
3
महामुंबई तापाने फणफणली! खोकून खोकून घसा लाल, ताप-सर्दीची लागण झपाट्याने वाढतेय
4
विधानमंडळ सचिव भोळे यांचे पंख छाटले; अन्य ३ सचिवांना सभापतींनी दिल्या जबाबदाऱ्या
5
बेकायदा लाऊडस्पीकर रोखल्याचा दावा; सरकारवर अवमानाची कारवाई करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
विमानांचे वाढते तिकीट दर नियंत्रित करणार; डीजीसीएनं लोकलेखा समितीच्या बैठकीत दिली हमी
7
लाखभर शाळांचे शाळाबाह्य मूल्यांकन ३१ जुलैपर्यंत; ‘पीएम श्री’ शाळांचाही समावेश
8
संविधान हे देशातील रक्तविरहित क्रांतीचे शस्त्र; सरन्यायाधीश गवई यांचा महाराष्ट्र विधिमंडळातर्फे सत्कार
9
‘एक्स’वर ७० रुपयांत जेवण, स्टेशनवर ‘ढूंढते रह जाओंगे’; रेल्वेची करामत, प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर 
10
टेनिस बॉल क्रिकेटमुळे होणार दादोजी कोंडदेव स्टेडियम ‘बोल्ड’; सीझन बॉल स्पर्धेलाच मैदान देणार
11
कुजबुज! रामदास आठवलेंच्या भूमिकेत एकनाथ शिंदे, गवईंच्या सत्कार सोहळ्यात सगळे हसले
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

आॅसींची विजयी सलामी

By admin | Updated: January 17, 2015 02:55 IST

फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या (१२७) आक्रमक शतकी खेळीच्या बळावर आॅस्ट्रेलियाने तिरंगी मालिकेतील पहिल्या वन-डेत इंग्लंडवर

सिडनी : फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या (१२७) आक्रमक शतकी खेळीच्या बळावर आॅस्ट्रेलियाने तिरंगी मालिकेतील पहिल्या वन-डेत इंग्लंडवर ३ विकेट्सनी मात केली़ या विजयासह आॅस्ट्रेलियाने एक बोनस गुणही आपल्या नावे केला़ इंग्लंडने इयान मोर्गनच्या (१२१) शतकाच्या बळावर ४७़५ षटकांत सर्व बाद २३४ धावांचे आव्हान उभे केले़ आॅस्ट्रेलियाने हे लक्ष्य ७ गड्यांच्या बदल्यात ३९़५ षटकांत सहज पूर्ण केले़ विजयाचा शिल्पकार ठरलेल्या वॉर्नरने ११५ चेंडूंचा सामना करताना १८ खणखणीत चौकार लगावले़ सिडनी क्रिकेट मैदानावर झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या २२ सामन्यांमध्ये शतकी खेळी करणारा वॉर्नर आॅस्ट्रेलियाचा पहिलाच खेळाडू ठरला आहे़ माफक लक्ष्याचा पाठलाग करताना आॅस्ट्रेलियाच्या वॉर्नरव्यतिरिक्त एकाही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही़ मात्र, एका बाजूने वॉर्नरने इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली़ कांगारू संघाकडून स्टीवन स्मिथ याने ४७ चेंडूंत २ चौकार आणि एका षटकारासह ३७ धावांची खेळी साकारली़ अ‍ॅरोन फिंच १५ आणि शेन वॉटसन याने १६ धावांचे योगदान दिले़ आॅस्ट्रेलियाने हे लक्ष्य ४० षटकांत आत पूर्ण केल्यामुळे त्यांच्या खात्यात बोनस गुणांसह ५ गुण जमा झाले़वॉर्नर सामनावीर पुरस्काराचा दावेदार होता़ मात्र त्याचा सहकारी मिशेल स्टार्कने ४ विकेट्स मिळविल्या़ यामुळे तोच सामन्याचा मानकरी ठरला़ इंग्लंडकडून क्रिस ओक्स याने ४ गडी बाद केले़ ख्रिस जॉर्डन आणि मोईन अली यांनी प्रत्येकी १ बळी मिळविला़ त्याआधी इंग्लंडने कर्णधार इयान मोर्गनच्या (१२१) शतकाच्या बळावर २३४ धावा केल्या़ त्याने आपल्या खेळीत ११ चौकार आणि ३ षटकार खेचले़ जोस बटलर याने २८ धावांची खेळी केली़ यानंतर एकाही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही़ इंग्लंडचे इयान बेल (०), जेम्स टेलर (०), मोईन अली (२२) हे अनुभवी खेळाडू अपयशी ठरले़ मोर्गन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला़ स्टार्कने पहिल्या तीन चेंडूंत इंग्लंडच्या २ गड्यांना तंबूचा रस्ता दखविला़ या धक्क्यातून संघ अखेरपर्यंत सावरू शकला नाही़ आॅस्ट्रेलियाकडून जेम्स फॉल्कनर याने ३, तर पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्सवेल आणि झेविअर डोहर्टी यांनी प्रत्येकी १ बळी मिळविला़(वृत्तसंस्था)