शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
2
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
3
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
4
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
5
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
8
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
9
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
10
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
11
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
12
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
13
एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या
14
बाथरुममधील बादली खूपच खराब झालीय? एकही रुपया खर्च न करता 'अशी' दिसेल नव्यासारखी
15
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
16
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
17
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
18
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
19
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
20
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत

आॅस्ट्रेलियाचा दणदणीत विजय

By admin | Updated: July 19, 2015 22:14 IST

मिशेल जॉन्सन ३/२७, जोस हेजलवूड २/२० आणि नाथन लियोन २/२७ यांच्या भेदक गोलंदाजीमुळे आॅस्ट्रेलिया संघाने अ‍ॅशेज मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाचा ४०५

लंडन : मिशेल जॉन्सन ३/२७, जोस हेजलवूड २/२० आणि नाथन लियोन २/२७ यांच्या भेदक गोलंदाजीमुळे आॅस्ट्रेलिया संघाने अ‍ॅशेज मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाचा ४०५ धावांनी दणदणीत पराभव केला. चौथ्या दिवशी संपलेल्या या लढतीमुळे आॅस्ट्रेलियाने मालिकेत १-१ बरोबरी साधली. आॅस्ट्रेलिया संघाने उपाहाराआधी आपला दुसरा डाव २ बाद २५४ या धावांवर घोषित करताना इंग्लंडसमोर विजयासाठी ५0९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. इंग्लंडने अ‍ॅलेस्टर कुक (११), अ‍ॅडम लिथ (७), गॅरी बॅलेन्स (१४), इयान बेल (११), बेन स्टोक्स (0), बटलर (११), मोईन अली (0) हे सात बिनीचे खेळाडू गमावले आहेत. तत्पूर्वी इंग्लंडने आज सकाळी बिनबाद १0८ या धावसंख्येवरून पुढे खेळण्यास प्रारंभ केला. सलामीवीर फलंदाज ख्रिस रॉजर्स २ षटकानंतर चक्कर आल्यामुळे रिटायर्ड हर्ट झाला. त्या वेळेस तो ४९ धावांवर खेळत होता. डेव्हिड वॉर्नरने ८३ आणि स्टीव्हन स्मिथने ५८ धावांची आक्रमक खेळी केली.क्लार्कने दुसरा डाव घोषित केला तेव्हा तो स्वत: ३२ आणि मिशेल मार्श २७ धावांवर खेळत होते. इंग्लंडकडून फक्त आॅफस्पिनर मोईन अलीने ७८ धावांत २ गडी बाद केले. अलीने वॉर्नरला कुककरवी झेलबाद केल्यानंतर स्मिथलाही तंबूत धाडले.इंग्लंडला हा सामना जिंकायचा असल्यास त्यांना मोठी कामगिरी करावी लागणार आहे. कसोटी क्रिकेटमधील सर्वांत मोठे लक्ष्य यशस्वी पेलण्याचा विक्रम वेस्ट इंडीजच्या नावावर आहे. त्यांनी आॅस्ट्रेलियाविरुद्ध २00३ मध्ये सेंट जोन्स येथे ७ बाद ४१८ धावा करीत विजय मिळवला होता. इंग्लंडचा विक्रम ३३२ धावा आहे. तो त्यांनी १९२८-२९ मध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध मेलबोर्न येथे केला होता. आॅस्ट्रेलियाने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली.

कुकच्या नावावर इंग्लंडसाठी ‘नर्व्हस नाइन्टीज’चा विक्रमलंडन : इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलेस्टर कुक याच्या नावावर लॉर्ड्स येथे सुरू असलेल्या दुसऱ्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यादरम्यान नकोसा वाटणारा विक्रम जोडला गेला आहे. कुक हा कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा शतकापासून वंचित राहिला. त्यामुळे सात वेळा शतकापासून वंचित राहण्याचा इंग्लंडकडून त्याच्या नावावर हा विक्रम लागला. कुकने अ‍ॅशसच्या गेल्या २३ डावांत एकही शतक केले नाही आणि लॉर्ड्स कसोटीत तो तिसऱ्या दिवशी शनिवारी ९६ धावांवर बाद झाला.

संक्षिप्त धावफलक : आॅस्ट्रेलिया पहिला डाव ८ बाद ५६६ (घोषित). दुसरा डाव २ बाद २५४ (घोषित). (डेव्हिड वॉर्नर ८३, स्टीव्हन स्मिथ ५८, क्लार्क नाबाद ३२, मार्श नाबाद २७, रॉजर्स ४९. मोईन अली २/७८)इंग्लंड : पहिला डाव ३१२. दुसरा डाव ३७ षटकात सर्वबाद १०३. (जोरुट १७, स्टुअर्ट ब्रॉड २५, जॉन्सन ३/२७, हेजलवूड २/२०, नाथन लियोन २/२७, मिशेल मार्श १/८, स्टार्क १/१६, ).(वृत्तसंस्था)