शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

स्मिथच्या शतकाने आॅस्ट्रेलियाचा धावांचा डोंगर

By admin | Updated: August 21, 2015 22:52 IST

स्टीव्हन स्मिथचे दमदार शतक (१४३) आणि त्याने वोजेस (७६) सोबत चौथ्या विकेटसाठी केलेल्या १४६ धावांच्या भागीदारीच्या जोरावर अ‍ॅशेस

ओव्हल : स्टीव्हन स्मिथचे दमदार शतक (१४३) आणि त्याने वोजेस (७६) सोबत चौथ्या विकेटसाठी केलेल्या १४६ धावांच्या भागीदारीच्या जोरावर अ‍ॅशेस मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत आॅस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४८१ धावा केल्या. याला उत्तर देताना इंग्लंडने सावध सुरवात करुनही पन्नाशीच्या आत त्यांचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले होते. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा इंग्लंडने २३.३ षटकांत ३ गडी गमावून ६० धावा केल्या होत्या. यावेळी रुट ६ धावांवर खेळत होता. तर अ‍ॅडम लीथ(१९), अ‍ॅलिस्टर कुक (२२) व इयान बेल (१०) तंबूत परतले होते. कालच्या ३ बाद २८७ या धावसंख्येवरुन पुढे खेळताना आॅस्ट्रेलियाकडून आज दिवस गाजविला तो संघाचा भावी कर्णधार स्टिव्हन स्मिथने. त्याने स्वत:चे शतक झळकावताना संघालाही मजबूत स्थितीत नेवून ठेवले. काल अर्धशतकापासून ३ धावांनी दूर असलेल्या वोजेसने आपले अर्धशतक पूर्ण केले. उपहारापूर्वी स्मिथनेही आपले शतक पूर्ण केले. यासाठी त्याने १९७ चेंडू खेळले. उपहाराला खेळ थांबला तेव्हा आॅस्ट्रेलियाच्या ७ बाद ३७६ धावा झाल्या होत्या. तळाच्या फळीतील मिशेल स्टार्क याने अर्धशतकी खेळी करीत स्मिथ सोबत ९१ धावांची भागीदारी केल्यामुळे आॅस्ट्रेलियाला पाचशेच्या उंबरठ्यावर जाता आले. स्मिथ १४८ धावा करुन आठव्या गड्याच्या रुपाने तर स्टार्क ५0 धावांवर नवव्या विकेटच्या रुपात बाद झाला. (वृत्तसंस्था)