शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
2
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
3
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
4
भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी...
5
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय
6
बाहुबली नेते राजा भैय्या यांच्या मुलांनी आईवर केले गंभीर आरोप, म्हणाले, "आमच्या घरात…’’  
7
ललिता पंचमी व्रत २०२५: शुक्रवारी इच्छापूर्तीसाठी 'असे' करा ललिता पंचमीचे व्रत; टाळा 'ही' एक चूक!
8
"हो मला बाबा व्हायचंय...", ५९व्या वर्षी सलमान खानला हवंय मूल, म्हणाला...
9
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
10
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
11
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
12
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
13
"पैशाचं सोंग आणता येत नाही, मग सरकार शेतकऱ्यांना जीवन संपवू देणार का?’’, विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
14
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
15
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
16
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
17
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
18
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
19
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
20
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या

ऑस्ट्रेलियाचा डाव संपला, भारत विजयाची गुढी उभारणार

By admin | Updated: March 27, 2017 20:40 IST

चौथ्या कसोटीत दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाचा संघ 137 धावात ढेर झाला. भारताने पहिल्या डावात 332 धावा करत 32 धावांची आघाडी घेतली होती

ऑनलाइन लोकमतधर्मशाळा, दि. 27 - चौथ्या कसोटीत दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाचा संघ 137 धावात ढेर झाला. भारताने पहिल्या डावात 332 धावा करत 32 धावांची आघाडी घेतली होती. भारताला विजयासाठी 106 धावांची लक्ष्य आहे. चार सामन्याची कसोटी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. चौथा कसोटी सामना जिंकून भारत विजयाची गुढी उभारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारताकडे फलंदाजीसाठी अजून दोन दिवस बाकी आहेत. दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने बिनबाद 19 धावा केल्या असून भारताला विजयासाठी अजून 87 धावांची आवश्यकता आहेभारताने आज सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवले. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक झाली. वॉर्नर-रेनशॉ जोडीने संथ सुरुवात केली. पण भुवनेश्वर-यादव जोडीने कांगारुंची शिकार केली. या जोडीने योग्य टप्प्यावर मारा करत कांगारूंना बाद केले. उमेश यादवने वॉर्नर-रेनशॉ यांना बाद करत ऑस्ट्रेलियावर दबाव निर्माण केला. वॉर्नर 6 आणि रेनशो 8 धावांवर बाद झाला. तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथही आज अपयशी ठरला. भुवनेश्वरने स्मिथच्या दांड्या वाकवत भारताला मोठं यश मिळवून दिले. पहिल्या डावात चार बळी घेणाऱ्या कुलदीपला दुसऱ्या डावात एकही बळी घेता आला नाही. भारताकडून यादव, जाडेजा आणि अश्विनने प्रत्येकी 3-3 असे बळी घेतले आहेत. तर भुवनेश्वर कुमारला एक विकेट मिळाली. ऑस्ट्रेलियाकडून मॅक्सवेलने 45 धावांची खेळी केली आहे. तर वेड 25 धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथ 17 धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाच्या पाच फलंदाजांना 10चा आकडाही पार करता आला नाही. कालच्या ६ बाद २४८ धावांवरून भारताने आज खेळाला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी नाबाद असलेल्या साहा-जाडेजाच्या जोडीने तिसऱ्या दिवशी आक्रमक खेळ केला. जाडेजाने चौफेर फटकेबाजी करताना 63 धावांची खेळी केली. या विस्फोटक खेळीदरम्यान त्याने चार चौकार आणि चार षटकार लगावले. जाडेजा बाद झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी भारतीची पडझड झाली आणि भारताचा डाव 332 धावांवर संपुष्टात आला. साहाने 31 धावांची संयमी फलंदाजी करताना जाडेजाला उत्तम साथ दिली. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायने सर्वाधिक पाच बळी घेतले तर कमिन्सने 3 गडी बाद केले.