शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

आॅस्ट्रेलियाला ऐतिहासिक विजयाचा मान

By admin | Updated: November 30, 2015 00:55 IST

शॉन मार्शच्या संघर्षपूर्ण फलंदाजीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने पहिल्या दिवस/रात्र कसोटी सामन्यात रविवारी तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा तीन गडी राखून पराभव केला

अ‍ॅडिलेड : शॉन मार्शच्या संघर्षपूर्ण फलंदाजीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने पहिल्या दिवस/रात्र कसोटी सामन्यात रविवारी तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा तीन गडी राखून पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजय मिळवला. न्यूझीलंडने आॅस्ट्रेलियापुढे विजयासाठी १८७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना आॅस्ट्रेलियाच्या फलंदाजांना संघर्ष करावा लागला. डेव्हिड वॉर्नरच्या (२५) खेळीनंतरही आॅस्ट्रेलियाची एकवेळ ३ बाद ६६ अशी अवस्था झाली होती, पण संघात पुनरागमन करणाऱ्या शॉर्न मार्शने (४९) अ‍ॅडम व्होग्सच्या (२८) साथीने चौथ्या विकेटसाठी ४९ धावांची तर धाकटा बंधू मिशेल मार्शच्या (२८) साथीने सहाव्या विकेटसाठी ४६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केल्या. आॅस्ट्रेलियाने ७ गड्यांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले. त्याआधी, न्यूझीलंडचा दुसरा डाव २०८ धावांत संपुष्टात आला. वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडने दुखापग्रस्त मिशेल स्टार्कच्या अनुपस्थितीत आॅस्ट्रेलियाचे आक्रमण सांभाळताना २४.५ षटकांत ७० धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेतले. आॅस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० ने सरशी साधताना न्यूझीलंडची २०१३ पासून मालिका न गमावण्याची मोहीम थोपवली. न्यूझीलंडने २०१३ पासून आठ मालिका खेळताना एकही मालिका गमावली नाही. अ‍ॅडिलेड ओव्हलमध्ये गेल्या ६४ वर्षांत प्रथमच कसोटी सामना तीन दिवसांत संपला. यापूर्वी तीन दिवसांमध्ये संपलेल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजने आॅस्ट्रेलियाचा ६ गडी राखून पराभव केला होता. लक्ष्याचा पाठलाग करताना आॅस्ट्रेलियाने नियमित अंतरात गडी गमावले. सहाव्या षटकात ट्रेन्ट बोल्टने जो बर्न्सला माघारी परतले. त्यानंतर डग ब्रेसवेलच्या गोलंदाजीवर मिशेल सँटनरने स्टीव्हन स्मिथचा (१४) झेल सोडला. ब्रेसवेलने वॉर्नरला टीम साऊदीकडे झेल देण्यास भाग पाडले. (वृत्तसंस्था) स्मिथ बोल्टच्या गोलंदाजीवर पायचितचा बळी ठरला. स्मिथने रेफरलचा आधार घेतला, पण हा निर्णय त्याच्या विरोधात गेला. शॉन मार्श व व्होग्सने संयमी फलंदाजी केली. बोल्टने तिसऱ्या सत्रात व्होग्सला माघारी परतवत न्यूझीलंडच्या आशा पल्लवीत केल्या. त्यानंतर कसोटी सामन्यात प्रथमच एकत्र फलंदाजी करणाऱ्या मार्श बंधूंनी आक्रमक पवित्रा स्वीकारला. ब्रॅन्डन मॅक्युलमने अखेर सँटनरकडे चेंडू सोपवण्याच जुगार खेळला. मिशेल षटकार ठोकत त्याचे स्वागत केले, पण त्यानंतर मिड आॅनवर केन विलियम्सनकडे झेल देत माघारी परतला. आॅस्ट्रेलिया संघाने लक्ष्याकडे वाटचाल करताना शॉन मार्श व पीटर नेव्हिल (१०) यांना गमावले. दुखापतग्रस्त स्टार्कला फलंदाजीसाठी उतरावे लागले. पीटर सिडलने (नाबाद ९) अखेर दोन धावा वसूल करीत संघाला लक्ष्य गाठून दिले. बोल्टने ६० धावांच्या मोबदल्यात पाच बळी घेतले.त्याआधी, कालच्या ५ बाद ११६ धावसंख्येवरुन पुढे खेळताना न्यूझीलंडचा संघाने अखेरच्या पाच विकेट ९२ धावांच्या मोबदल्यात गमावल्या. पदार्पणाची कसोटी खेळणाऱ्या सँटनरने सर्वाधिक ४५ धावांची खेळी केली. बी.जे. वॉटलिंगला माघारी परतवणाऱ्या हेजलवूडने त्यानंतर मार्क क्रेग (१५) याला बाद करीत डावातील पाचवा बळी नोंदवला. सँटनची खेळी नॅथन लियोनने संपवली. त्याने लियोनच्या गोलंदाजीवर षटकार ठोकला. त्यानंतर दोन चेंडूंनी पुन्हा आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात त्याचा अंदाज चुकला. यष्टिरक्षक पीटर नेव्हिलने त्याला यष्टिचित केले. हेजलवूडने ट्रेन्ट बोल्टला बाद करीत न्यूझीलंडचा डाव गुंडाळला. (वृत्तसंस्था)धावफलक : न्यूझीलंड पहिला डाव २०२. आॅस्ट्रेलिया पहिला डाव २२४. न्यूझीलंड दुसरा डाव (कालच्या ५ बाद ११६ धावसंख्येवरुन पुढे) : वॉटलिंग झे. स्मिथ गो. हेजलवूड ०७, क्रेग झे. नेव्हिल गो. हेजलवूड १५, सँटनेर यष्टिचित नेव्हिल गो. लियोन ४५, साऊदी झे. लियोन गो. एम. मार्श १३, बोल्ट त्रि. गो. हेजलवूड ०५, ब्रेसवेल नाबाद २७. अवांतर (८). एकूण ६२.५ षटकांत सर्वबाद २०८. गोलंदाजी : हेजलवूड २४.५-५-७०-६, सिडल १४-६-३५-०, एम. मार्श १४-२-५९-३, लियोन १०-१-३६-१. आॅस्ट्रेलिया दुसरा डाव : वॉर्नर झे. साऊदी गो. ब्रेसवेल ३५, बर्न्स पायचित गो. बोल्ट ११, स्मिथ पायचित गो. बोल्ट १४, व्होग्स झे. साऊदी गो. बोल्ट २८, एस. मार्श झे. टेलर गो. बोल्ट ४९, एम. मार्श झे. विलियम्सन गो. सँटनेर २८, नेव्हिल झे. वॉटलिंग गो. बोल्ट १०, सिडल नाबाद ०९, स्टार्क नाबाद ००. अवांतर (३). एकूण ५१ षटकांत ७ बाद १८७. गोलंदाजी : साऊदी १६-१-५८-०, बोल्ट १६-३-६०-५, ब्रेसवेल ११-२-३७-१, क्रेग ६-०-२२-०, सँटनेर २-०-८-१.