शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

आॅस्ट्रेलियन फलंदाज अ‍ॅडम व्होग्सची निवृत्ती

By admin | Updated: February 15, 2017 00:36 IST

आॅस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज अ‍ॅडम व्होग्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

मेलबोर्न : आॅस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज अ‍ॅडम व्होग्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. पाहुण्या श्रीलंका संघाविरुद्ध कॅनबरामध्ये खेळल्या जाणारा सराव सामना कुठल्याही आंतरराष्ट्रीय संघाविरुद्ध माझा अखेरचा सामना राहील, असे व्होग्सने जाहीर केले. व्होग्स बुधवारी श्रीलंका संघाविरुद्ध पंतप्रधान इलेव्हन संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याने या लढतीच्या पूर्वसंध्येला निवृत्तीचे संकेत दिले. व्होग्स सध्या ३७ वर्षांचा असून त्याने दोन वर्षांपूर्वी जून २०१५ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध डोमिनिका कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. त्याने पदार्पणाच्या लढतीत नाबाद १३० धावांची खेळी केली होती. पदार्पणाच्या लढतीत शतकी खेळी करणारा तो सर्वांत प्रौढ खेळाडू ठरला होता. इंग्लंड दौऱ्यात मात्र तो धावा फटकावण्यासाठी संघर्ष करीत असल्याचे चित्र दिसले. त्यानंतर त्याने न्यूझीलंड व वेस्ट इंडिजविरुद्ध चमकदार कामगिरी केली. व्होग्सने न्यूझीलंडविरुद्ध नाबाद २६९ धावांची खेळी केली तर वेस्ट इंडिजविरुद्ध द्विशतक झळकावले. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये बाद न होता सर्वाधिक ६३४ धावा फटकावण्याच्या विक्रमाची नोंद आहे. व्होग्सन आपला अखेरचा कसोटी सामना नोव्हेंबर २०१६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होबार्टमध्ये खेळला होता. (वृत्तसंस्था)१५ कसोटी सामन्यांनंतर त्याची सरासरी ९५.५० होती, पण श्रीलंका दौरा व त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांत त्याची कामगिरी विशेष चांगली नव्हती. त्यामुळे त्याच्या सरासरीमध्ये घसरण झाली. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये व्होग्सने २००७ मध्ये पदार्पण केले होते. त्याने कारकिर्दीत ३१ वन-डे सामन्यांत ४५.७८ च्या सरासरीने ८७० धावा तर सात टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ४६.३३ च्या सरासरीने १३९ धावा केल्या आहेत. (वृत्तसंस्था)