शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
4
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
5
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
6
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
7
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
8
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
9
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
10
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
11
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
12
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
13
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
14
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
15
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
16
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
17
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
18
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
19
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
20
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं

ऑस्ट्रेलिया विश्वविजेता

By admin | Updated: March 29, 2015 16:26 IST

वर्ल्डकप फायनलमध्ये न्यूझीलंडवर सात विकेट्सनी मात करत ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा विश्वचषकावर नाव कोरले आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मेलबर्न, दि. २९ -  वर्ल्डकप फायनलमध्ये न्यूझीलंडवर सात विकेट्सनी मात करत ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा विश्वचषकावर नाव कोरले आहे. वन डे कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळणा-या मायकल क्लार्कने अर्धशतक ठोकून संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. न्यूझीलंडचे १८४ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने ३३.१ षटकांत ३ गडी गमावून गाठले. 

रविवारी वर्ल्डकपचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पार पडला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या भेदक मा-याने न्यूझीलंडचा डाव १८३ धावांवर आटोपला. न्यूझीलंडने दिलेले १८४ धावांचे माफक आव्हान ऑस्ट्रेलियाने सहज गाठले. ट्रेंट बॉल्टच्या पहिल्याच षटकात सलामीवीर अॅरोन फिंचचा शून्यावर बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाची स्थिती १ बाद २ धावा अशी होती. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरने ४५ धावांची झंझावाती खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा पाया रचला. वॉर्नर बाद झाल्यावर स्टिव्हन स्मिथने कर्णधार मायकेल क्लार्कला मोलाची साथ देत संघाला विजयाच्या दिशेने नेले. वन डेतील शेवटचा सामना खेळणा-या मायकल क्लार्कने सामन्यात अर्धशतक ठोकून संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले. क्लार्क व स्टिव्हन स्मिथने ११२ धावांची भागीदारी केली. क्लार्क ७४ धावांवर असताना बाद झाला. क्लार्क बाद झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाला विजयासाठी फक्त ९ धावांची आवश्यकता होती. स्टिव्हन स्मिथने चौकार मारत संघाला दिमाखदार विजय मिळवून दिला. स्मिथने नाबाद ५६ धावांची खेळी केली. 

दरम्यान प्रथम फलंदाजी करणा-या न्यूझीलंडच्या फलंदाजांची ऑस्ट्रेलियन मा-यासमोर भंबेरी उडाली होती. न्यूझीलंडला धडाकेबाज सुरुवात करुन देणारा कर्णधार ब्रँडन मॅक्यूलम पहिल्याच षटकांत शून्यावर बाद झाला. मिशेल स्टार्कचा भेदक मा-याने मॅक्यूलमने त्रिफळाचीत केले.  यानंतर ग्लेन मॅक्सवेलच्या फिरकीने मार्टिन गुप्टिलला १५ धावांवर बाद केले. गुप्टिल वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला असून त्याने ९ सामन्यांमध्ये ५४७ धावा केल्या आहेत. यामध्ये २ शतकं व एका अर्धशतकाचा समावेश आहे. मिशेल जॉन्सनच्या गोलंदाजीवर केन विल्यम्सन १२ धावांवर झेलबाद झाला. यामुळे न्यूझीलंडची स्थिती १२.२ षटकांत ३ बाद ३९ अशी झाली. यानंतर रॉस टेलर व ग्रँट इलियट या जोडीने चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत किवींचा डाव सावरला. या जोडीने न्यूझीलंडला ३५ षटकांत १५० धावा करुन दिल्या. मात्र पॉवर प्लेच्या पहिल्याच चेंडूवर रॉस टेलर ४० धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ कोरी अँडरसन व ल्यूक रॉंचीही शून्यावरच तंबूत परतले.  डॅनियल व्हिटोरीने इलियटला साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र ९ धावांवर असताना व्हिटोरीही बाद झाल व न्यूझीलंडची स्थिती ७ बाद १६७ अशी झाली. ग्रँट एलियट ८३ धावांवर असताना विकेट किपरकडे सोपा झेल देत माघारी परतला.  यानंतर मेट हेन्री शून्यावर बाद झाला. टीम साऊदी मॅक्सेवलच्या चपळ क्षेत्ररक्षणाने ११ धावांवर बाद झाला व न्यूझीलंडचा डाव १८३ धावांवर आटोपला. 

ऑस्ट्रेलियातर्फे मिशेल जॉन्सन व जेम्स फॉल्कनर यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. मिशेल स्टार्कने दोन तर ग्लेन मॅक्सवेलने एक विकेट घेतली. न्यूझीलंडचे चार फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही.  सामन्यात तीन विकेट घेणारा जेम्स फॉल्कनरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

--------------

विश्वविजयी ऑस्ट्रेलिया

 

वर्षयजमानविजेता
२०१५ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडऑस्ट्रेलिया
२००७वेस्ट इंडिजऑस्ट्रेलिया
२००३दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वेऑस्ट्रेलिया
१९९९इंग्लंडऑस्ट्रेलिया
१९८७भारत, पाकिस्तानऑस्ट्रेलिया