शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

आॅस्ट्रेलिया ‘क्लीन स्वीप’च्या उंबरठ्यावर

By admin | Updated: January 7, 2017 04:30 IST

पाकिस्तान संघ आॅस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसअखेर पुन्हा पराभवाच्या खाईत लोटला गेला

सिडनी : पाकिस्तान संघ आॅस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसअखेर पुन्हा पराभवाच्या खाईत लोटला गेला आहे. ४६५ धावांचे लक्ष्य गाठणाऱ्या पाकने ५५ धावांत एक गडी गमविला. ४१० धावांनी मागे असलेल्या पाहुण्या संघाचे नऊ फलंदाज शिल्लक आहेत. फिरकी गोलंदाज नाथन लियॉन याने पदार्पण करणारा शार्जिल खान(४०)याला बाद केले. पाकसाठी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा अझहर अली (११) आणि नाईट वॉचमन यासिर शाह (३) खेळपट्टीवर होते. आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने दुसरा डाव २ बाद २४१ धावांवर घोषित केला. चौथ्या दिवशी १६ षटकांचा खेळ शिल्लक असताना यजमानांनी पाकला ४६५ धावांचे अशक्यप्राय लक्ष्य दिले. आॅस्ट्रेलियाने पहिला डाव ८ बाद ५३८ अशी मजल गाठून घोषित केला होता. प्रत्युत्तरात पाकने ३१५ धावा उभारल्या. उस्मान ख्वाजा याने ९८ चेंडंूत ७९ आणि पीटर हँडस्कोम्ब याने २५ चेंडंूत नाबाद ४० धावा ठोकल्या. ४३ चेंडूंत ५९ धावांचे योगदान देणारा स्मिथ स्वत: हॉटस्पॉटचा बळी ठरला. त्याच्या मालिकेत ४४१ धावा झाल्या. डेव्हिड वॉर्नरने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात जलद (२३ चेंडू, ७ चौकार, ३ षट्कार) अर्धशतक ठोकून संघाला वेगवान सुरुवात करून दिली. याआधी २०१४ मध्ये पाकचा कर्णधार मिस्बाह उल हक याने अबुधाबी येथे आॅस्ट्रेलियाविरुद्ध २१ चेंडंूत ५० धावांची नोंद केली होती. वॉर्नरने २७ चेंडूंत ५५ धावा ठोकल्या. रियाझने त्याची दांडी गूल केली. (वृत्तसंस्था)