शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

आॅस्ट्रेलिया ‘अ’ मजबूत स्थितीत

By admin | Updated: July 31, 2015 00:46 IST

कामचलावू फिरकीपटू बाबा अपराजितने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत प्रथमच पाच बळी घेण्याची कामगिरी केली असली, तरी आॅस्ट्रेलिया ‘अ’ने सलामीवीर कॅमरून बॅनक्रॉफ्टच्या शतकाच्या

चेन्नई : कामचलावू फिरकीपटू बाबा अपराजितने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत प्रथमच पाच बळी घेण्याची कामगिरी केली असली, तरी आॅस्ट्रेलिया ‘अ’ने सलामीवीर कॅमरून बॅनक्रॉफ्टच्या शतकाच्या जोरावर भारत ‘अ’ विरुद्ध दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात मोठी आघाडी घेतलीे. बॅनक्रॉफ्टने एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये १५० धावांची दमदार खेळी केली. त्याने कर्णधार उस्मान ख्वाजासोबत (३३) सलामीला १११ धावांची, तर कॅलम फर्ग्युसनसोबत (५४) चौथ्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी केली. आॅस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात ९ बाद ३२९ धावांची मजल मारताना १९४ धावांची आघाडी घेतली. कसोटी कर्णधार विराट कोहली व सिनिअर फलंदाज चेतेश्वर पुजारा यांच्या उपस्थितीनंतरही भारत ‘अ’चा पहिला डाव १३५ धावांत संपुष्टात आला होता. अपराजितने ७४ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले. ओझाने ९९ धावांच्या मोबदल्यात ३ फलंदाजांना माघारी परतवले. आॅस्ट्रेलिया ‘अ’ने बिनबाद ४३ धावसंख्येवरून पुढे खेळताना सावध फलंदाजी केली. ओझाने ख्वाजाला पायचीत केले. त्यानंतर त्याने जो बेर्न्स (८) व पीटर हँड््सकाम्ब (०) यांना तंबूचा मार्ग दाखवत भारताला पुनरागमन करण्याची संधी दिली. दडपणाखाली भारतीय गोलंदाजांना अपेक्षित यश लाभले नाही. फर्ग्युसनने बॅनक्राफ्टला चांगली साथ देत शतकी भागीदारी नोंदवली. श्रेयस गोपालने फर्ग्युसनला माघारी परतवले. त्यानंतर अपराजितने मार्क्स स्टोनिस (१०), मॅथ्यू वॅड (११) व बॅनक्रॉफ्ट यांना बाद केले. बॅनक्रॉफ्टने २६७ चेंडूंना सामोरे जाताना १६ चौकार व १ षटकार लगावला. त्यानंतर स्टिव्ह ओकैफीने संयमी फलंदाजी केली, तर गुरविंदर संधूने आक्रमक पवित्रा घेतला. संधला अपराजितने बाद केले. त्याने २७ चेंडूत २ चौकार व ४ षटकार खेचत ३६ धावा फटकावल्या. अपराजितने एस्टन एगरला (६) माघारी परतवत आपला पाचवा बळी घेतला. आजचा खेळ थांबला त्या वेळी कोकैफी (६) व अ‍ॅण्ड्य्रू फेकेट (०) खेळपट्टीवर होते. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक :भारत अ पहिला डाव : १३५ सर्वबाद.आॅस्ट्रेलिया अ पहिला डाव : ९ बाद ३२९. बॅनक्रॉफ्ट १५०, उस्मान ख्वाजा ३३, फर्गसन ५४, संधु ३६. प्रग्यान ओझा ३/३२, बाबा अपराजीत ५ /२३ गोपाल १/ २२.