शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आॅस्ट्रेलिया मालिकेत बरोबरीसाठी खेळणार

By admin | Updated: July 16, 2015 02:21 IST

यष्टिरक्षक ब्रॅड हॅडीन अखेरच्या क्षणी बाहेर पडल्यामुळे संघर्ष करणारा आॅस्ट्रेलिया संघ इंग्लंडविरुद्ध गुरुवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या अ‍ॅशेज कसोटी सामन्यात शेन वॉटसनला

लंडन : यष्टिरक्षक ब्रॅड हॅडीन अखेरच्या क्षणी बाहेर पडल्यामुळे संघर्ष करणारा आॅस्ट्रेलिया संघ इंग्लंडविरुद्ध गुरुवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या अ‍ॅशेज कसोटी सामन्यात शेन वॉटसनला संघाबाहेर ठेवू शकतो. आॅस्ट्रेलियाचे लक्ष्य हा सामना जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी करणे, हे असेल.वॉटसन कार्डिफ येथे झालेल्या पहिल्या सामन्यातील दोन्ही डावांत एकाच पद्धतीने पायचीत झाला होता. इंग्लंडने हा सामना चौथ्या दिवशीच १६९ धावांनी जिंकला.वॉटसनचा गोलंदाज म्हणूनही मायकल क्लार्कने सोफिया गार्डन्स येथे जास्त उपयोग केला नव्हता. आॅस्ट्रेलियाच्या फेअरफॅक्स मीडियाच्या रिपोर्टनुसार ३४ वर्षीय वॉटसनला लॉर्ड्स कसोटीतून बाहेर करून त्याच्या जागी अष्टपैलू मिशेल मार्शला संघात ठेवले जाऊ शकते. मार्श हा वॉटसनच्या तुलनेत ११ वर्षांनी लहान आहे. गेल्या १६ डावांत वॉटसनला फक्त दोन अर्धशतके झळकावता आली. माजी कर्णधार स्टीव्ह यानेदेखील मिशेल मार्शला वॉटसनच्या जागी पसंती दिली आहे.हॅडीनने मंगळवारी संघाबाहेर बसण्याचा निर्णय घेतला. संघाच्या प्रवक्त्यानुसार ‘कौटुंबिक’ कारणामुळे त्याने असे केले; परंतु तो संघासोबत असेल. त्यामुळे पीटर नेविल याला पदार्पणाची संधी मिळेल. डावखुरा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क लॉर्ड्स कसोटीआधी पूर्णपणे तंदुरुस्त होईल, असा आॅस्ट्रेलियाला विश्वास आहे. पहिल्या कसोटीदरम्यान घोट्याच्या दुखापतीमुळे त्याने सराव सत्रात सहभाग घेतला नव्हता.