ऑनलाइन लोकमत
अॅडलेड, दि. १२ - डेव्हिड वॉर्नरच्या शतकी खेळीमुळे पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाने ५ गडी गमावत २९० धावा केल्या असून त्यांच्याकडे एकूण ३६३ धावांची आघाडी आहे.चौथ्या दिवसाचा खेळ संपताना हॅडिन (१४) व स्मिथ (५२) खेळत होते.
शुक्रवारी सकाळी भारताचा डाव ४४४ धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियातर्फे लियॉनने ५ बळी टिपले. ऑस्ट्रेलियाचे रॉजर्स (२१), वॉर्नर (१०२), वॉटसन (३३) व क्लार्क (७) हे खेळाडू पटापट तंबूत परतले. मात्र वॉर्नरने शतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. पण १०२ धावांवर असताना कर्ण शर्माच्या चेंडूवर बाद झाला. तर मार्श ४० धावांवर असताना तंबूत परतला.
भारतातर्फे कर्ण शर्माने २ तर रोहित शर्मा, शमी व अॅरॉनने प्रत्येकी एक गडी बाद केला.