शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पाकपुढे आॅस्ट्रेलियाचे आव्हान

By admin | Updated: March 20, 2015 01:46 IST

विश्वचषकाच्या तिसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात उद्या शुक्रवारी पाकिस्तानविरुद्ध आॅस्ट्रेलिया ही लढत होईल.

अ‍ॅडिलेड : विश्वचषकाच्या तिसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात उद्या शुक्रवारी पाकिस्तानविरुद्ध आॅस्ट्रेलिया ही लढत होईल. घरच्या मैदानावर यजमान संघाला चारीमुंड्या चीत करण्याचे अवघड आव्हान पाकपुढे राहणार आहे.सुरुवातीचे दोन्ही सामने गमविणाऱ्या पाकने नंतर ओळीने चार विजयांची नोंद केली. त्यात द. आफ्रिकेसारख्या दिग्गज संघाला पराभवाची धूळ चारली होती. या विजयात कर्णधार मिस्बाह उल हकची फलंदाजी निर्णायक राहिली. २००५ साली आॅस्ट्रेलियाला पर्थमध्ये पाकने नमविले होते. तेव्हापासून आॅस्ट्रेलिया संघ पाककडून घरच्या मैदानावर पराभूत झालेला नाही.पाक संघ आॅस्ट्रेलियाकडून गेल्या सात सामन्यांत पराभूत झाला आहे. पण, चमत्कार घडविण्यात पटाईत असलेल्या पाकला विजय साकार करायचा झाल्यास गोलंदाजांना मेहनत घ्यावी लागेल. विश्वचषकात उभय संघ आतापर्यंत आठ सामने खेळले. त्यात पाकने चार, तर आॅस्ट्रेलियाने चार सामन्यांत विजय मिळविले आहेत. २०११ च्या विश्वचषकात मात्र कोलंबोत झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात पाकने आॅस्ट्रेलियाला पराभूत केले होते, हे विशेष. उद्याच्या सामन्यात डावखुरा वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफान खेळू शकणार नसल्याने पाकला धक्का बसला. तो जखमी आहे. त्याच्या अनुपस्थितीत वहाब रियाझ आणि सोहेल खान यांच्यावर मिस्बाहच्या आशा राहतील. याशिवाय आयर्लंडविरुद्ध शतकी खेळी करणारा यष्टिरक्षक सर्फराज अहमद याच्याकडून पुन्ही अशी खेळी अपेक्षित आहे. मिस्बाह म्हणाला,की माझ्या सहकाऱ्यांचे मनोबल उंचावलेले आहे. सलग चार विजयांमुळे संघात उत्साहाला उधाण आले. आम्ही विजयी वाटेवर असल्याने आमच्यापुढे कुठला संघ आहे, याच्याशी कर्तव्य नाही. आॅस्ट्रेलियाला कुणीही जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानत असल्याने त्यांना पराभूत केल्यास आमचा मोठा विजय मानला जाईल. पाक क्रिकेटसाठीदेखील हे शुभसंकेत ठरतील.चार वेळेचा चॅम्पियन आॅस्ट्रेलिया मात्र सामन्यात वरचढ वाटतो. पण या स्पर्धेत त्यांची कामगिरी संमिश्र ठरली. लंका आणि इंग्लंडविरुद्ध या संघाने देखणी कामगिरी केली, पण सहयजमान न्यूझीलंडने त्यांचा पराभव केला होता. आॅस्ट्रेलियाचे कोच डेरेन लेहमन यांनी मात्र आपल्या संघाच्या यशाची खात्री असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले,‘‘येथून पुढे कुठलीही हयगय चालणार नाही. स्वाभाविक खेळाद्वारे सामने जिंकावेच लागतील. आमच्या खेळाडूंना लवकर सूर गवसतो, शिवाय कामगिरीतही ते झटपट सुधारणा करतात.’’ (वृत्तसंस्था) इरफान चुकीच्यावेळी संघाबाहेर झाला. संघावर हा मोठा आघात आहे. इरफानचे जखमी होणे दुर्दैवी ठरले. तो महत्त्वाचा खेळाडू आहे. तरीही त्याची उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला जाईल.- वकार युनूस, पाक कोचपाकला हरविणे हे मोठे आव्हान आहे. त्यांचा दिवस असेल, तर ते कमालीचा खेळ करतात. पाक संघ धोकादायक असल्यामुळे त्यांना कमकुवत मानण्याची चूक आमच्या हातून घडणार नाही.- शेन वाटसन, अष्टपैलू खेळाडू, आॅस्ट्रेलिया हेड टू हेड४आॅस्ट्रेलिया व पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ९२ एक दिवसीय लढती झाल्या आहेत. यामध्ये आॅस्ट्रेलियाने ५७ तर पाकिस्तानने ३१ वेळा विजय नोंदविला आहे. एक सामना टाय झाला असून तर ३ सामन्यांचा निकाल लागू शकला नाही. ४विश्वचषकामध्ये दोन्ही संघांमध्ये ८ लढती झाल्या आहेत. यामध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी ४ सामने जिंकले आहेत.